बीड -जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या बोगस शिक्षक भरतीची चौकशी करण्यासाठी उपसंचालक कार्यालयाचे पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने दिवसभर शिक्षण विभागाची चौकशी केल्याने नेमकं काय काय बाहेर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये 2022 ते 2025 या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी थेट मंत्रालयापर्यंत करण्यात आल्या होत्या अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून खाजगी संस्था चालकांची संगणमत करत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे या दोघांनी बोगस शिक्षक भरती केल्याचे तक्रार झाली होती
ही तक्रार झाल्यानंतर मंत्रालयातून शिक्षण संचालक यांना चौकशीचे आदेश दिले होते त्यांनी छत्रपती संभाजी नगरचे उपसंचालक यांच्याकडे चौकशी सुपूर्द केली होती त्यानुसार उपसंचालक कार्यालयातील वाणी हिंगोली चे शिक्षणाधिकारी आणि इतर दोन अधिकारी असे चार ते पाच जणांचे पथक बीड जिल्हा परिषदेत चौकशीसाठी मंगळवारी दाखल झाले.
या पथकाने गेल्या दोन-तीन वर्षात शिक्षण विभागाकडून ज्या ज्या शिक्षकांना संच मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्या जवळपास 270 पेक्षा अधिक फाईल जमा करण्याचे आदेश दिले आहेत त्यातील काही फाईल या पथकाने आपल्या सोबत घेऊन चौकशी सुरू केली आहे
दरम्यान माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची अमरावती येथे बदली झाल्यामुळे त्यांची चौकशी कशी केली जाणार आणि त्यांनी जे कुटाणे केले आहेत त्याची उत्तर कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे
संभाजीनगरचे जे पथक चौकशीसाठी बीडमध्ये दाखल झाले त्यांच्या ताईंनातीत या सगळ्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असलेले शिक्षण विस्तार अधिकारी राऊत आणि बेंडेकर हे दोघे होते त्यामुळे ही चौकशी पारदर्शी होणार का आणि चौकशी पथकाला पाहिजे ती माहिती मिळणार का की चौकशी पथकच मॅनेज केले जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे





Leave a Reply Cancel reply