News & View

ताज्या घडामोडी

hq720 1

संतोष साठी लाखोंचा असंतोष रस्त्यावर!

बीड – मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, वाल्मिक कराड ला अटक झालीच पाहिजे, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या मागण्यासाठी बीडमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. संतोष ला न्याय द्या, वाल्मिक ला अटक करा, वाल्मिक कराड च्या संपत्तीची चौकशी करा असे पोस्टर घेऊन महिला, पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीमहाराज, मनोज जरांगे पाटील, खा बजरंग सोनवणे, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके, आ अभिमन्यू पवार, आ जितेंद्र आव्हाड,नरेंद्र पाटील यांच्यासह नेते कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

विंडमिलच्या प्रकरणात वॉचमॅन हा बौद्ध आणि संतोष हा मराठा होता. वाल्मिक कराडचे गुंड तिथं गेल्यावर संतोष देशमुख तिथं गेले. जातीपातीच्या राजकारण करणाऱ्यांना हे सांगा…मी ओबीसी आहे तरी म्हणतो या वाल्मिक कराडला आधी आत टाका, असं संदीप क्षीरसागर म्हणाले. मी विरोधात असलो तरी मंचावर उपस्थित असलेले सुरेश धस भाजपमध्ये आहेत, प्रकाशदादा सोळंके अजित पवार गटात आहेत, तरी ते छाती ठोकून सांगतायत आता टाका…आज आमदार अभिमन्यू पवार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. तरी अभिमन्यू पवारांना विषय कळताच पाठिंबा दिला, असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं.

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार काय म्हणाले?

कोपर्डीचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले, संतोष देशमुख हत्येविरोधात देखील राज्यभरात मोर्चे निघतील. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे- संदीप क्षीरसागर

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. सभागृहात ज्या पद्धतीने सुरेश अण्णा धस बोलले. अजून पाच मिनिटं बोलले, असते तर सभागृह रडलं असतं. मोर्चात हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि अठरा पगड जातींचे लोक माणूस म्हणून आलेले आहेत. या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अजून अटक नाही, त्याचा गुन्हा थेट संबंध लागतो तरी त्याचा नावं नाही, अशी टीकाही संदीप क्षीरसागर यांनी केली. वाल्मिक कराडला सारंक्षण धनंजय मुंडेचं असल्याचे बोलले जाते. वाल्मिक कराड अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे. जोपर्यंत तपास होतं नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी देखील संदीप क्षीरसागर यांनी केली.

वाल्मिकचा वाल्या झाला -आव्हाड!

जाती आपण कधी सोडणार आहोत? संतोष देशमुख जातीसाठी मेला नाही. बीड हा पुरोगामी जिल्हा ओळखला जातो. वाल्मीक नाही तो वाल्या आहे त्रेता युगात वाल्याचा वाल्मीक झाला आणि कल्युगात वाल्मीकचां वाल्या झाला. लोक म्हणतात वंजाऱ्याच्या विरोधात बोलतायत माणुसकी आहे का त्याला? आंधळे राख ठड यांचा खून झाला. तेपण वंजारी होते.अशोक सोनवणेची अट्रोसिटि दाखल झाली असती तर देशमुखांचा खून झाला नसता. या सर्वाला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. संतोष मेल्यावर तुम्ही जिवंत झाला.बीड हा बंडखोरांचा जिल्हा आहे. राजकीय बंडखोरी करणारा आहे. बीडने गोपीनाथ मुंडे नाना पाटील अनेक जण दिले. एकी अशीच ठेवा. बीडमध्ये ठिणगी पडली आहे. याचे जनआंदोलन होईल. अटक झाली नाही तर महारष्ट्रमध्ये आग पेटेल, असे आव्हाड यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version