अंतरवली सराटी -मराठवाड्यातील 25मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. बीड, केज, फुलंब्री यासह 25ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली, ज्या जागेचे नाव जाहीर होणार नाही तिथं उमेदवार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेत रात्री उशिरा ही घोषणा केली. बीड, केज, वसमत, हिंगोली, फुलंब्री नांदगाव येथे उमेदवार उभे करणार असून इतर ठिकाणी निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे ते म्हणाले.
मराठा समाजाच्या नेत्यांनी एकच उमेदवार द्यावा, उद्या ज्याचे नाव फायनल होईल त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे रहा, इतरांनी अर्ज मागे घ्या असेही जरांगे पाटील म्हणाले.





Leave a Reply Cancel reply