News & View

ताज्या घडामोडी

images 2023 08 23T112522.579

जयदत्त क्षीरसागर यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रवेश?

बीड -बीडचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या दृष्टीने मुंबईत हालचालीना वेग आला आहे. त्यांच्यासोबत भाजप नेते रमेश आडसकर हे देखील प्रवेश करणार आहेत.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चाळीस वर्षेपासून सक्रिय असलेले माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षांकडून उभे राहणार याबाबत तर्क वितर्क लढवळे जात होते.

क्षीरसागर हे अपक्ष लढतील अशी देखील चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्यात विद्यमान आ संदीप क्षीरसागर यांचे नाव ना आल्याने चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. तसेच माजलगाव विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले रमेश आडसकर हे देखील पवार गटात प्रवेश करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *