News & View

ताज्या घडामोडी

प्रकाश सोळंके रिटायर्ड!पुतण्याकडे सोपवला वारसा!

माजलगाव -माजलगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आ प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला वारस म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे.

माजलगाव मतदार संघात चार टर्म आमदार असलेल्या प्रकाश सोळंके यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबाबत घोषणा केली आहे. सोळंके यांच्या नंतर यावेळी त्यांचा पुतण्या जयसिंह हा विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरणार अशी चर्चा होती, मात्र लोकसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघात भाजपला मिळालेले मताधिक्य पाहता आ सोळंके पुन्हा एकदा निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती.

दरम्यान आ सोळंके यांनी रविवारी स्वतःच सोशल मीडियावरून यापुढील काळात आपले पुतणे जयसिंह सोळंके हे आपले वारसदार असतील अशी घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *