आष्टी – तालुक्यातील टाकळी अमिया येथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः छापा घालत किमान एक हजार क्विंटल पावडर जप्त केली.
बीड जिल्ह्यासह नगर, संभाजीनगर, आणि पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात दुधाची भेसळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र यावर किरकोळ कारवाई होते परंतु कठोर शिक्षा होत नाही.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादन आष्टी तालुक्यात होते, मात्र दुधात भेसळ देखील याच तालुक्यात होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.
दरम्यान आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया या ठिकाणी अंबादास चौधरी यांच्या गोडावून मध्ये हजारो क्विंटल भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर असल्याचे जिल्हाधिकारी पाठक यांना समजले. त्यांनी रात्री दोन अडीच वाजता अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या सोबत या ठिकाणी छापा घातला.
पहाटे सात वाजेपर्यंत पाठक घटनास्थळी हजर होते. या ठिकाणी आतापर्यंत जप्त केलेल्या पावडरची किंमत पन्नास ते साठ लाखाच्या आसपास आहे, पोलीस कारवाई सुरु असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
Leave a Reply