बीड -भगवान बाबा प्रतिष्ठान शेजारी असलेल्या हिंदू स्म्शानभूमीच्या चतुसीमेत बदल करण्यासोबतच अनेक कुटाणे करणाऱ्या ट्रेसर सलीम याच्यावर कारवाई केली तर काही कमिशन भेटणार नाही किंवा परसेन्टेज भेटणार नाही म्हणून सिइओ नीता अंधारे त्याला पाठीशी घालत आहेत का? अशी चर्चा सर्वसामान्य माणसात सुरु आहे.
बीड नगर परिषदेत ट्रेसर म्हणून नोकरीस असलेल्या सलीम उर्फ डिके याच्यावर अनेक प्रकरणात गंभीर आरोप झालेले आहेत. सर्व्हे नंबर 119 मधील कुटाणा असो कि भगवान बाबा प्रतिष्ठान नजिक असलेल्या स्म्शानभूमीची चतु सीमा बदलण्याचा प्रकार असो. सलीम बाबत अनेक तक्रारी आहेत. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
या गोष्टीला महिना उलटला तरीदेखील अद्याप कसलीच कारवाई सिइओ अंधारे यांच्याकडून झालेली नाही. उलटपक्षी अनेक बेकायदेशीर कामे ट्रेसर सलीम च्या सांगण्यावरून त्यांनी केले आहेत. कोणत्याही कामात त्यांना परसेन्टेज लागते तरच काम होते अशी चर्चा आहे. त्यामुळेच सलीम वर कारवाई केली तरी काहीच पदरात पडणार नाही हे लक्षात आल्याने अंधारे मॅडम त्याच्यावर कारवाई करत नसल्याची चर्चा सुरु आहे.तक्रारदारांनीच आता यामध्ये काही टक्केवारी गोळा करून द्यावी म्हणजे सलीमवर कारवाई होईल अशी चर्चा आहे.
Leave a Reply