मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने पाच लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नगर मधून लंके,बारामती सुळे,शिरूर मधून कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे, मात्र बीड ,माढा येथील उमेदवारी चा तिढा अद्याप कायम आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकींच्या पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये वर्ध्यात नुकतेच काँग्रेसमधून शरद पवार गटात आलेले अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, तसेच नगर दक्षिणमधून कालच अजित पवार गटातून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- आजचे राशीभविष्य!
- अंबडचा लाचखोर तहसीलदार चव्हाण एसीबी च्या जाळ्यात!
- आजचे राशीभविष्य!
- भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!
- आजचे राशीभविष्य!
“भाजपला पराभूत करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला पाहिजे. काही लोक जर वेगळे लढण्याचा विचार करत असेल तर समविचारी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे सर्वांनी एकसंधपणे लढलं पाहिजे,” असे आवाहनही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.





Leave a Reply Cancel reply