नवी दिल्ली- अंडर 19 क्रिकेट वल्ड कप मध्ये बीडच्या सचिन धस याने पदार्पणातच शतक ठोकत नेपाळ विरुद्ध मोठी धावसंख्या उभारत भारताचा डाव सावरला .
नेपाळ विरुद्ध सचिन धस याच्यानंतर उदय याने शतक ठोकलं. उदय आणि सचिन या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळसमोर 298 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 297 धावा केल्या.
उदय आणि सचिनचा शतकी तडाखा
उदयने नेपाळ विरुद्ध 107 बॉलमध्ये 9 चौकारांसह 100 धावा केल्या. मात्र उदयला शतकानंतर एकही धाव करता आली नाही. उदयला गुलशन झा याने सुभाष भंडारी याच्या हाती कॅच आऊट केलं. तर दुसऱ्या बाजूला सचिन धस या बीडच्या पठ्ठ्याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी शतक करत डाव सावरला. सचिनने 101 बॉलमध्ये 3 षटकारांसह 11 चौकारांच्या मदतीने 116 धावांची खेळी केली.
- भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!
- आजचे राशीभविष्य!
- खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
- आजचे राशीभविष्य!
- कीर्तिरूपी उरावे………!
सचिन धस आणि उदय सहारन या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाकडून आदर्श सिंह याने 21, प्रियांशू मुलिया याने 19 आणि अर्शीन कुलकर्णी याने 18 धावांचं योगदान दिलं. तर नेपाळकडून गुलशन झा याने 3 विकेट्स मिळवल्या. तर आकाश चांद याच्या खात्यात 1 विकेट गेली.





Leave a Reply Cancel reply