बीड- बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तिप्पटवाडी या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून बळीराम शेंडगे यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली.मात्र या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना नव्ह्ती हे विशेष.
बीड तालुक्यातील तिप्पटवाडी येथील बळीराम शेंडगे आणि बबन शेंडगे यांचे गेल्या अनेक दिवसापासून भांडण आणि वाद सुरू होते.काही दिवसापूर्वी या दोघात मारामाऱ्या झाल्या होत्या.गणेश चतुर्थीच्या दिवशी बळीराम यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी बळीराम यांना गावातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेबाबत बीड ग्रामीण पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनाच याची खबर नव्हती.आता आमच्याकडे एम एल सी आली आहे,नोंद करण्यात येईल त्यानंतर नेमकं प्रकरण काय आहे ते कळेल असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
Leave a Reply