News & View

ताज्या घडामोडी

Tag: beed#बीड शहर

  • शहर पोलिसांची मोठी कारवाई !

    बीड- कपड्याच्या दुकानात जायचे,दोन चार ड्रेस चोरायचे असा प्रकार करत करत तब्बल चार लाख रुपयांचे कपडे चोरणाऱ्या चोरट्याला बीड शहर पोलिसांनी अटक केले.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने या चोराच्या मुसक्या आवळल्या. जानेवारी महिन्यात सुभाष रोडवरील आर के मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानातून चार लाख रुपये किमतीचे रेडीमेड कपडे चोरी गेल्याची माहिती मिळाली…

  • विशाल साडी सेंटर फोडले !

    बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार…

  • निर्बुद्ध वाचळवीर !

    विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ,आपला धर्म कोणता असावा ,आपली जात कोणती असावी, आपला पंथ कोणता, असावा आपली भाषा कोणती असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव काय असावं हे कोणाच्याच हातात नसतं .विशेष म्हणजे अनेक वेळा कोण कुठल्या जातीत जन्मला म्हणून तो मोठा झाला तेव्हा त्याने नावलौकिक मिळवला असं…

  • बीडमध्ये गोळीबार,दोन जखमी !

    बीड- शहरातील कालिका नगर,चराठा रोड भागात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे.यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा पोहचला आहे. कालिका नगर कमानी जवळ शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली.यामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले…

  • घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !

    बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे. बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या…

  • जीएडी पंधरा अन शिक्षण विभाग दहा हजार ! शिक्षक बदल्यात लाखोंची उलाढाल !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक पदवीधर, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांच्या घाऊक बदल्या नुकत्याच केल्या.यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा खेळ चालला.जीएडी अर्थात सामान्य प्रशासन आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाकडून किमान पंचवीस अन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये घेऊनच बदल्यांचे काम केले. बीड जिल्हा परिषद मध्ये दाम घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही हे वेगळे सांगायची…

  • सेंट अँस शाळेची मुजोरी ! विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला !!

    बीड – बीड शहरातील सेंट अँस शाळेने चार वर्षाच्या मुलाला प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळाल्याने प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वास्तविक पाहता प्रवेशाच्या वेळी कोणत्याही प्रकारे लेखी किंवा तोंडी परीक्षा घेता येत नाही.मात्र या शाळेने नियम धाब्यावर बसवून हा प्रकार सुरू केला आहे.याबाबत मनोज जाधव यांच्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाने चौकशी समिती गठीत…

  • साखर उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीत राज्याची भरारी !

    पुणे-साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मितीची क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली असून पुढील वर्षाअखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ‘संपलेल्या गाळप हंगामात सर्वाधिक २१० साखर कारखान्यांकडून गाळप झाले. २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०५२ लाख टन ऊसाचे गाळप होऊन १०५…

  • मुकादम आणि वाहतुकदारांनी केली दोनशे कोटींची फसवणूक !

    बीड- यंदा ऊसतोडणी मुकादम आणि वाहतूकदरांकडून साखर कारखान्यांची दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सर्वाधिक ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील पंधरा वर्षांत राज्यातील साखर कारखानदारांची दोन हजार कोटी रुपये ऊसतोडणी मुकादम व वाहतूकदारांनी बुडविले आहेत. दरवर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते.पण, यंदा हे प्रमाण वाढले आहे….

  • सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी अचानक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.त्यानंतर पक्षात…