News & View

ताज्या घडामोडी

सेंट अँस शाळेची मुजोरी ! विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला !!

बीड – बीड शहरातील सेंट अँस शाळेने चार वर्षाच्या मुलाला प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळाल्याने प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वास्तविक पाहता प्रवेशाच्या वेळी कोणत्याही प्रकारे लेखी किंवा तोंडी परीक्षा घेता येत नाही.मात्र या शाळेने नियम धाब्यावर बसवून हा प्रकार सुरू केला आहे.याबाबत मनोज जाधव यांच्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाने चौकशी समिती गठीत केली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशा वेळी लेखी अथवा तोंडी परीक्षा घेता येत नाही. परंतु या शाळेत सर्रासपणे विद्यार्थ्यांची प्रवेशा वेळी लेखी परीक्षा नर्सरी, एलकेजी, युकेजी पासून ते दहावी वर्गा पर्यंत घेतली जाते आणि विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्याला शाळेत प्रवेश नाकारला जातो. जर विद्यार्थी ३ ते ४ वर्षात लिहू, वाचू शकत असेल तर त्याला या शाळेत हजारो रुपये फी देवून शिकवण्याची गरज काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच शाळांची वेळ जास्त असल्याने विद्यार्थांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाताना वह्या आणि पुस्तके न्यावे लागत आहेत यामुळे दप्तराचे ओझे जास्त असल्याकारणाने त्यांना शारीरिक इजा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांना वेगळी वाकणूक देत विद्यार्थ्यांची वर्गवारी करत त्यांना तुकड्यानुसार वेगवेगळ्या वर्ग खोल्यात बसवले जात आहे. वास्तविक पाहता पाच ते सात वर्षांपासून एकाच तुकडीत आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक दुसऱ्या तुकड्यात बसवल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन अनेक विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यास नकार देत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याचबरोबर शाळा प्रशासन विद्यार्थी व पालकांना हीन दर्जाची वागणूक देत हम करे सो कायदा या तत्त्वावर चालत आहे. याचा पालकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *