News & View

ताज्या घडामोडी

Tag: #परळी

  • परळीत राडा, एक ठार !

    परळी- शहरातील बरकत नगर भागात एका लग्न समारंभात झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले.दोन गटात तुफान राडा झाला.यामध्ये एक जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली. परळी येथील बरकत नगर भागात एक लग्न समारंभ आयोजित केला होता.कन्या शाळा रोड ते बरकत नगर भागात दोन गटात तुफान मारामारी झाली.लग्नातील कार्यक्रमामधून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.दोन गटात…

  • वैद्यनाथ च्या चेअरमन पदी पंकजा मुंडे !

    परळी- येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी माजीमंत्री पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्ष पदी चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात दिलजमाई झाली असल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप नेते स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार…

  • बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !

    बीड- ग्रामीण भागातील अनुसूचित जाती च्या कुटुंबांना शबरी आदिवासी योजने अंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यातील 1179 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण…

  • दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य अपात्र !

    बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या…

  • पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !

    बीड- राज्यातील काही ठराविक भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कारखाने यातून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे भाजप अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सहकारी तत्वावरील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक कर्जाचे…

  • थांबेल तो संक्या कसला ! मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली चक्क बस !!

    मुंबई- थांबेल तो संक्या कसला अस म्हणत विक्रमविर अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचं कौतुक केलंय. नाट्यप्रयोग संपल्यावर मुंबईकडे जात असताना बस ड्रायव्हर ची तब्येत बिघडल्याने स्वतः संकर्षण ने गाडी चालवली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत दामले यांनी या आपल्या सहकारी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. नाटकाचा प्रयोग आटोपल्यानंतर कलाकार संकर्षण…

  • वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!

    परळी- स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाची दिलजमाई झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. स्वतः पंकजा मुंडे,यशश्री मुंडे,वाल्मिकी कराड आणि अजय मुंडे हे नूतन संचालक असतील. परळी सह मराठवाड्यात नावाजलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक पदासाठी निवडणूक जाहीर झाली…

  • माझ्यासाठी दिल्ली खूप दूर – धनंजय मुंडे यांनी जोडले पत्रकारांसमोर हात !

    बीड- मी राज्यातच काम करण्यास इच्छुक असून माझ्यासाठी दिल्ली अजून वीस-पंचवीस वर्ष दूर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेसाठी त्यांच्या नावाची होणारी चर्चा थांबवली . जवाहर आणि वैद्यनाथ मध्ये दोघा बहीण भावांची झालेली अंडरस्टँडिंग ही नवे समीकरण उदयाला घालणार आहे का या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडत हे तुम्ही समोरच्यांना सुद्धा…

  • रिटायरमेंट ला एक दिवस असणाऱ्यांना पदोन्नती देण्याचा शिक्षण विभागाचा डाव !

    शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे दाम करी काम धोरण शासनाला चुना लावणारे !! बीड- नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बीडचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी भलतेच मेहरबान झाल्याचे दिसत आहे.31 मे ला रिटायर होणाऱ्या काही मुख्याध्यापक आणि शिक्षकांना 30 मे रोजी पदोन्नती देण्यासाठी कुलकर्णी आणि टीम कामाला लागली आहे.यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली असून एक दिवसानंतर रिटायर होणाऱ्यांना सुट्टीच्या…

  • अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार !

    बीड- अंशतः अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे त्याच शाळेवर समायोजन करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सरकारकडे पाठवला आहे.लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यास या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. तरीपण सद्य:स्थितीत राज्यातील ८९ हजार शाळांमध्ये ६७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १०० टक्के…