News & View

ताज्या घडामोडी

परळीत राडा, एक ठार !

परळी- शहरातील बरकत नगर भागात एका लग्न समारंभात झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले.दोन गटात तुफान राडा झाला.यामध्ये एक जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली.

परळी येथील बरकत नगर भागात एक लग्न समारंभ आयोजित केला होता.कन्या शाळा रोड ते बरकत नगर भागात दोन गटात तुफान मारामारी झाली.लग्नातील कार्यक्रमामधून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.दोन गटात झालेल्या मारामारी मध्ये शेख अल्लाउद्दीन याचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मारामारीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाद नेमका का झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *