Category: बीड
-

अंधारेच्या राज्यात नगर पालिकेत अंधार !
बीड- एक जिल्हाधिकारी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या तलाठ्याच्या घरी कार्यक्रमाला सहकुटुंब जातात,तलाठ्याचा थाट पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी यांची पत्नी विचारते की अहो तुम्ही तलाठी का नाही झालात, अर्थात तलाठ्याच ऐश्वर्य पाहून जिल्हाधिकाऱ्यांचे डोळे दिपतात,अशीच अवस्था बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे पाहिल्यावर कोणत्याही क्लास वन अधिकाऱ्यांची होईल. बीड नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर नीता अंधारे यांनी ज्या…
-

सुनील केदार यांची आमदारकी रद्द !
नागपूर- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेले काँग्रेस चे आ सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते, त्यानंतर केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द…
-

20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण – जरांगे पाटील यांचा सरकारला ईशारा !
बीड- सरकारने आरक्षण लवकर दिलं नाही तर 20 जानेवारी पासून मुंबईत मी स्वतः आमरण उपोषण करणार असा इशारा मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.बीड येथे आयोजित इशारा सभेत त्यांनी सरकार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. बीड येथे आयोजित इशारा सभेपुर्वी जरांगे पाटील यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सभास्थळापर्यंत भव्य दिव्य…
-

शहरातील शाळा उद्या बंद ! शिक्षणाधिकारी शिंदेंचा तुघलकी निर्णय !!
बीड- जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक काढलेल्या एका आदेशामुळे पालक वर्ग संभ्रमात पडला आहे.शनिवारी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी काढल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही विभागाचा पदभार सांभाळणारे शिक्षणाधिकारी शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की,23/12/2023 रोजी बीड शहरातील सर्व शाळा बंद…
-

स्वेच्छा निवृत्ती घेतली एकाने नोकरी दिली दुसऱ्याला ! बीड नगर पालिकेचा भोंगळ कारभार !!
बीड- बीड नगर पालिकेत भोंगळ कारभार सुरू असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे.एखाद्या कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर अनुकंपा प्रमाणे वारसांना नोकरीचा लाभ मिळत नाही मात्र बीड नगर पालिकेने चक्क हा लाभ दिला आणि तो ही रक्ताच्या नात्याचा संबंध नसलेल्या व्यक्तीला. नगर पालिकेतील शेख खमरोद्दीन या कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली .त्यानंतर नगर पालिकेने प्रदीप वडमारे या व्यक्तीला…
-

निलंबित कर्मचाऱ्याचा मृत्यू ! नातेवाईकांनी मृतदेह आणला नगर पालिकेत !
गेवराई – नगर पालिकेतील कर्मचारी सोमनाथ राऊत यांना विना चौकशी निलंबित करून सन २०२० पासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्याची मागणी निलंबित कर्मचाऱ्याने वारंवार पालिकेकडे केली. मात्र राजकीय दबावापोटी त्यांना नोकरीवर रुजू करून घेण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप मयत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केला. गुरुवारी त्यांचे आजाराने निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह थेट…
-

मिलिया प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय ! सीआयडी चौकशीची मागणी –
बीड- शहरातील अंजुमन ए इशात तालीम या संस्थेच्या शाळेत आमेर काझी नावाच्या शिक्षकाने महिला शिक्षिकांसोबत अश्लील चाळे करून त्याची चित्रफीत पॉर्न साईट ला विकली.या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्याला अटक झालेली नाही,त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे.…
-

पुरीच्या नावावर सीओ च्या भावाची गुत्तेदारी अन बहीण बोगस बिलावर सह्या करी !
बीड- नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी आपल्या भावाच्या भल्यासाठी पुरी नावाच्या गुत्तेदाराचा वापर सुरू केला आहे.गेल्या दीड दोन महिन्यात नगर परिषदेच्या वेगवेगळ्या कामावर तब्बल दीड ते दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पुरीच्या नावावर भावाची गुत्तेदारी सुरू असताना बोगस बिलावर स्वतः मुख्याधिकारी अंधारे या बिनधास्त सह्या करत आहेत. याबाबत काही माजी…
-

माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांची चौकशी सुरू !
बीड- बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी असणारे वादग्रस्त सिद्धेश्वर माटे,शिवाजी आतकरे आणि निखिल बाहेगव्हाणकर यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे.त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे त्यांच्या कार्यालयाकडून मागवली आहेत,त्यांना या बोगस कामात मदत करणाऱ्यांवर सुद्धा सीईओ पाठक कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक असताना बेकायदेशीर पध्दतीने शिक्षण…
-

जेष्ठ पत्रकार सुनील क्षीरसागरांचा होणार सत्कार !
बीड -पुरोगामी आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते,पत्रकार असलेले ‘प्रजापत्र’ चे संपादक सुनील क्षीरसागर यांच्या कार्यकर्ता जीवनाची चाळीशी आणि वयाच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचा सेवा गौरव सोहळा बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.बुधवार दि.२० डिसेंबर रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते आणि संविधान अभ्यासक सुभाषजी वारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील…



