News & View

ताज्या घडामोडी

मराठा आंदोलकांनी माजी आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडला!

आष्टी- गाव चलो अभियानात चोभा निमगाव गावात पोहचलेल्या भाजपचे माजी आ भीमराव धोंडे यांच्या कार्यक्रमात मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडला. मराठा आरक्षणाच्या विषयावरून सध्या सर्वत्र वातावरण तापले असून त्याचा फटका राजकीय मंडळींना सहन करावा लागत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. माजी आमदार भीमराव धोंडे हे गाव चलो अभियान या कार्यक्रमासाठी निमगाव चोभा या गावात आले होते. यावेळी हा कार्यक्रम सुरू असताना मराठा आंदोलक तिथे पोहचले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठ आंदोलकांनी कार्यक्रम बंद करायला लावला. मराठा आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहता कार्यक्रम त्वरित बंद करण्यात आला.

बीडच्या निमगाव चोभा या ठिकाणी असलेल्या एका महाविद्यालयात भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम सुरू होता. हा राजकीय कार्यक्रम असल्याची माहिती मराठा आंदोलकांना मिळाल्यावर ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले.एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची आदेश दिले असल्याने, मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या पक्षाचा एकही कार्यक्रम गावात होऊ देणार नसल्याची भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *