News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • कांदाचाळीसाठी मनरेगातून मिळणार मदत !

    कांदाचाळीसाठी मनरेगातून मिळणार मदत !

    बीड- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आता कांदाचाळ चा देखील समावेश करण्यात आला आहे. कांदाचाळ उभारणीच्या कामासाठी लागणारा किमान एक लाख 60 हजाराचा खर्च मनरेगा मधून दिला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रोहयो विभागाने केले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड…

  • वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी…

  • बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी ! संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता !!

    बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी ! संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता !!

    बीड- बारावीच्या परीक्षेत मास कॉपी अर्थात सामूहिक रित्या पेपर सोडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवरील अक्षर सारखेच असल्याने बोर्डाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.हे सगळे विद्यार्थी अंबाजोगाई आणि हिंगोली येथील आहेत.परीक्षा देताना एकाच व्यक्तीने पेपर सोडवले का?एकाच ठिकाणी बसून हा सगळा प्रकार मॅनेज केला गेला का ?यामध्ये संस्थाचालक सहभागी आहेत…

  • शाळा दुरुस्तीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली माहिती ! स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता कुलकर्णी यांनी निधी वितरित केल्याचा आरोप !!

    शाळा दुरुस्तीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली माहिती ! स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता कुलकर्णी यांनी निधी वितरित केल्याचा आरोप !!

    बीड- जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी डी पी डी सी च्या निधीमधून शाळा खोल्या दुरुस्ती आणि शाळा इमारत बांधकामासाठी तब्बल आठ कोटीच्या आसपास निधी मंजूर केला प्रत्यक्षात शिक्षण विभागाची मागणी साडेचार कोटीची होती मात्र जास्तीचा निधी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व त्यांच्या बगलबच्चांनी आपल्या जवळच्या गुत्तेदार पत्रकार राजकीय कार्यकर्ते यांना हा निधी टक्केवारी…

  • जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती…

  • आधी पक्षाबाबत निर्णय नंतर अपात्रतेबाबतचा – नार्वेकर !

    आधी पक्षाबाबत निर्णय नंतर अपात्रतेबाबतचा – नार्वेकर !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची कारवाई करण्याचे अधिकार मला दिले आहेत,त्यामुळे सर्व बाजू तपासून पाहून,तपासणी,उलट तपासणी करून मगच निर्णय घेण्यात येईल.राजकीय पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी होईल मग अपात्रतेबाबतचा होईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर नार्वेकर मीडियाशी बोलत होते.ते म्हणाले की,सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो….

  • पोलीस निरीक्षकाला अटक !

    पोलीस निरीक्षकाला अटक !

    परळी- पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडी ने अटक केली आहे.अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेने खळबळ उडाली आहे. 2014 साली परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर…

  • सर्वोच्च न्यायालयाची उद्धव ठाकरे यांना चपराक – मुख्यमंत्री शिंदे !

    सर्वोच्च न्यायालयाची उद्धव ठाकरे यांना चपराक – मुख्यमंत्री शिंदे !

    मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे चपराक बसली आहे,आम्ही धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवली अस म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल लागल्याबद्दल मी आमच्या सगळ्यांना शुभेच्छा मलाही दिल्या पण तुम्हाला देतो शुभेच्छा…

  • भाजपसोबत निवडणूक जिंकली अन खुर्ची साठी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठे गेली होती- फडणवीस !

    भाजपसोबत निवडणूक जिंकली अन खुर्ची साठी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठे गेली होती- फडणवीस !

    मुंबई- भाजपसोबत निवडणूक लढवली अन खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की,या निकालाबद्दल अधिक पूर्ण समाधान व्यक्त करतो आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोक…

  • शिंदे,फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – ठाकरे !

    शिंदे,फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – ठाकरे !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले आहेत ते पाहता या दोघांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपण राजीनामा दिला कारण ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासमोर मला विश्वास दर्शक प्रस्ताव मांडायचा नव्हता अस स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील सत्तासंघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मातोश्री येथे…