News & View

ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांनी दिली .

महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत.जानेवारी 2023 पासून या 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रती लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे असा खूप महत्त्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या या नव्या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. केशरी रेशन कार्डधारक म्हणजेच एपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.

या योजनेसाठी नेमकं काय करावं लागेल .!आपल्या कुटुंबातील सर्व लाभार्थी सभासदांचे पैसे हे कुटुंबातील महिला लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.म्हणून प्रत्येक कुटुंबातील महिला लाभार्थी व्यक्तीचे बँक अकाऊंट हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.लाभार्थींनी मिळालेल्या पैशातून गहु तांदुळ याची खरेदी करावी.अणि उरलेल्या पैसे आपल्या आवश्यकतेनुसार खर्च करावेत.आपल्या केशरी रेशनकार्ड वर धान्याऐवजी रोख पैसे प्राप्त करण्यासाठी रेशनकार्ड धारकांना राज्य शासनाने भरावयास सांगितलेला फाॅम भरायचा आहे.अणि हा फाॅम भरून लवकरात लवकर सबमीट करायचा आहे.

सदर फाॅम भरताना फाॅममध्ये अर्जदाराने आपले नाव अणि पत्ता टाकायचा आहे.यानंतर आपला शिधापत्रिकेच्या नंबर म्हणजेच रेशनकार्ड नंबर देखील टाकायचा आहे.यानंतर रेशनकार्ड वर असलेल्या आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या वैयक्तिक बँक खाते तपशील देखील भरून घ्यायचा आहे.अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इथे आपण जो बँकेचा तपशील देणार आहे त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

तसेच बँकेचे नाव,बँकेच्या शाखेचे नाव,बँक खाते क्रमांक, दिलेले असणे गरजेचे आहे.आपण दिलेले बँक खाते पर्सनल आहे का जाॅईट आहे हे देखील येथे द्यायचे आहे.शेवटी बॅकेचा आय एफसी कोड टाकून झाल्यावर फाॅम सबमीट करताना राशन कार्डच्या पहिल्या अणि शेवटच्या पेजची झेरॉक्स अणि बँकेच्या खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स फाॅमसोबत जोडायची आहे.
मग फाॅमवर आपल्या गावाचे नाव,दिनांक,आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव टाकुन आपली सही करायची आहे.अणि रेशन दुकानात जाऊन भरलेला फॉर्म जमा करून द्यायचा आहे.यानंतर जेव्हाही धान्याऐवजी पैशांची वाटणी सुरू केली जाईल तेव्हा आपल्या कुटुंबातील लाभार्थी व्यक्तींची रक्कम आपल्या कुटुंबातील महिला प्रमुखाच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.

बीड जिल्ह्यात केशरी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाख आहे,त्यांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी तहसीलदार, तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या पातळीवर जनजागृती केली आहे.वारंवार बैठका घेण्यात आल्या आहेत.रेशन दुकानदार मार्फत इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत.जसजसे अर्ज येतील त्याप्रमाणे लाभार्थी निश्चित करून योजना सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *