News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • अंबाजोगाई बाजार समिती डीएम च्या ताब्यात !

    अंबाजोगाई बाजार समिती डीएम च्या ताब्यात !

    अंबाजोगाई- अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे 15 संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले असून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे केवळ तीन संचालक निवडून आले आहेत हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे बीड जिल्ह्यातील बीड गेवराई माजलगाव वडवणी केज अंबाजोगाई आणि परळी यासह पाटोदा कृषी उत्पन्न…

  • काय झालं बीड बाजार समिती निवडणुकीत !

    काय झालं बीड बाजार समिती निवडणुकीत !

    बीड- बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर याने माजी मंत्री तथा आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती आपल्याकडे खेचून घेण्यात संदीप यांना यश आले असून काकाला त्यांनी दिलेला धक्का राज्याच्या राजकारणात विशेष चर्चिला जात आहे,संदिप यांच्या पॅनल च्या पंधरा…

  • वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!

    वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!

    बीड- राज्यातील ज्या विनाअनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर झाले आहे,त्यांचे प्रस्ताव तपासणीसाठी बीडच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात सध्या जोरात दुकानदारी सुरू आहे.कुलकर्णी,शिंदे,सोनवणे,शेळके,राऊत,हजारे,काकडे,खटावकर या सगळ्यांनी किमान पन्नास आणि कमाल दोन लाखाचा रेट काढल्याने संस्थाचालक बेजार झाले आहेत. बीड जिल्ह्यातील ज्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना  वीस टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे अशा किंवा ज्यांना…

  • दिग्गज नेते ठाण मांडून ! बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष !!

    दिग्गज नेते ठाण मांडून ! बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष !!

    बीड- शेतकरी,व्यापारी आणि हमाल यांच्याशी निगडित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला यंदा मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीत माजीमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ,तर बीडमध्ये आ संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे काका पुतण्या मतदान केंद्रावर ठाण मांडून बसल्याचे चित्र पहावयास मिळाले. ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम…

  • शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे पालकमंत्री सावे यांच्या अधिकारावर अतिक्रमण !

    शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे पालकमंत्री सावे यांच्या अधिकारावर अतिक्रमण !

    बीड- जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे पालकमंत्री अतुल सावे यांच्यापेक्षा स्वतःला मोठे समजू लागले आहेत.शिक्षण विभागातील शाळांच्या दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधकामासाठी मागणी केल्यापेक्षा अधिकचा निधी मंजूर झाला.मग काय कुलकर्णी यांनी आपल्या जवळच्या लोकांना खिरापत वाटल्याप्रमाणे कामांचे वाटप करत पालकमंत्री यांच्याच अधिकारावर गदा आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीने मार्च एन्ड जवळ…

  • राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार,अजित पवारांवर मोठी जबाबदारी !!

    राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार,अजित पवारांवर मोठी जबाबदारी !!

    मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय वातावरण पाहता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. नव्या समिकरणामध्ये मोठा वाटा अजित पवार यांच्या पदरात पडण्याची देखील शक्यता आहे. या दृष्टीने मुंबईत राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. तब्बल नऊ महिन्यांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झाले.शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 40 आणि…

  • पाटोदा नगरपंचायत मध्ये 20 लाखाचे गौडबंगाल !

    पाटोदा नगरपंचायत मध्ये 20 लाखाचे गौडबंगाल !

    पाटोदा- नगरपंचायत स्थापना झाल्यानंतर तब्बल एक वर्ष पूर्वीच्या ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा व स्वच्छता समिती बँक खाते हस्तांतरित केले आहे.या दरम्यानच्या काळात बेकायदेशीरपणे २० लक्ष ४० हजार रुपये कोणी आणि कशासाठी उचलले याचे गोडबंगाल कायम आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपहाराची दाट शक्यता असून सदरील प्रकरणी शिवभूषण लक्ष्मणराव जाधव, अबलूक घुगे व शेख मोबीन यांनी सचिव नगर विकास, सचिव…

  • झुकेगा नही साला म्हणणारे अजित पवार उच्च न्यायालयात गुडघ्यावर आले !

    झुकेगा नही साला म्हणणारे अजित पवार उच्च न्यायालयात गुडघ्यावर आले !

    बीड- माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलात तरीही मी निर्णय बदलणार नाही अस म्हणत झुकेगा नही साला म्हणणारे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना उच्च न्यायालयात गुडघ्यावर टेकत माघार घ्यावी लागली.आपल्या हेकेखोर आणि मनमानी स्वभावामुळे 19 गावातील टेंडर प्रक्रिया रद्द करून मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्याचा पवार यांचा घाट न्यायालयाने उधळून लावला.अखेर जुनीच प्रक्रिया…

  • यावर्षी पाऊस पाणी भरपूर पण अतिवृष्टीची शक्यता !

    यावर्षी पाऊस पाणी भरपूर पण अतिवृष्टीची शक्यता !

    बुलढाणा – घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे अंदाज आज वर्तवण्यात आले आहे. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं…