News & View

ताज्या घडामोडी

अजित पवार वित्तमंत्री तर धनंजय मुंडे मंत्री !

बीड- राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप निर्माण झाला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राजभवन कडे रवाना झाले आहेत.त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 आमदार आहेत.ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील आहेत.अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ,धनंजय मुंडे असे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील.अजित पवार यांच्याकडे वित्तमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार आहे.

राज्याच्या राजकारनात मोठा भूकंप रविवारी अचानक आला.देवगिरी या शासकीय निवासस्थानी पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बैठक घेतली.या बैठकीला प्रफुल्ल पटेल देखील हजर होते.

बैठक संपवून पवार हे थेट राजभवन कडे रवाना झाले.त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राजभवन कडे निघाले आहेत.

अजित पवार,छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह नऊ जण मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *