Category: महाराष्ट्र
-

राजकारणातून एक्झिट घेणार- पंकजा मुंडेंच्या दाव्याने खळबळ !
मुंबई- मी वीस वर्षांपासून राजकारणात आहे मात्र तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही.सध्या राज्यातजे सुरू आहे किंवा अवतीभवती जे सुरू आहे ते पाहून कंटाळा आला आहे.मी दुःखी आहे,अशा पध्दतीने तडजोडी कराव्या लागल्या तर मी राजकारणातून एक्झिट घेईल असा दावा भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काही बातम्या आल्यानंतर संतापलेल्या पंकजा यांनी…
-

गुरुची विद्या गुरूला परत,मी कच्या गुरूचा चेला नाही- धनंजय मुंडे !
मुंबई – आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
-

अजित पवार उपमुख्यमंत्री !
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शपथ घेतली.त्यांच्यासोबत छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,धर्मराव बाबा आत्राम, यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर आदिती तटकरे ,अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात रविवारी जो भूकम्प आला त्याचे हादरे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस ला बसले.राष्ट्रवादी काँग्रेस मधील…
-

संदिप क्षीरसागर शरद पवारांसोबत !
बीड- राज्याच्या राजकारणात रविवारी एकीकडे राजकीय भूकंप घडत असताना बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार,छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे,धर्मराव आत्राम,संजय बनसोडे यांच्यासारखे दिगग्ज नेते सरकारमध्ये सामील होत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील.…
-

अजित पवार वित्तमंत्री तर धनंजय मुंडे मंत्री !
बीड- राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप निर्माण झाला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राजभवन कडे रवाना झाले आहेत.त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 आमदार आहेत.ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील आहेत.अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ,धनंजय मुंडे असे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील.अजित पवार यांच्याकडे वित्तमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. राज्याच्या राजकारनात मोठा भूकंप…
-

सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती !
बीड- छत्रपती संभाजी नगर चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.केंद्रेकर यांनी शासनाकडे स्वेच्छा निवृत्ती चा केलेला अर्ज शासनाने मंजूर केला आहे.शासकीय सेवेची अडीच वर्षे शिल्लक असताना केंद्रेकर यांनी निवृत्ती का घेतली याबद्दल चर्चा होत आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे महाराष्ट्रात परिचित असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी…
-

जिल्ह्यातील 76 मास्तरांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द !
बीड (प्रतिनिधी) – राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन 2018-19 मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.20 जुन 2023 रोजी…
-

प्रेमविवाह झाला अन तीन महिन्यात मुलीची आत्महत्या !
बीड- प्रेमविवाह होऊन तीन महिन्याचा काळ होत नाही तोच प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ढोबळसांगवी इथे घडली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे…
-

आंतर जिल्हा बदलीवर बंदी ! जिथे नियुक्ती त्याच जिल्ह्यात निवृत्ती !!
बीड- यापुढे नव्याने शिक्षक भरती झाल्यास या शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीचा लाभ घेता येणार नाही.शासनाने काढलेल्या आदेशात याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार आंतर जिल्हा बदली हवी असल्यास आहे त्या ठिकाणच्या नोकरीचा राजीनामा देऊन नव्याने भरती प्रक्रिया पार करून हव्या त्या जिल्ह्यात नियुक्ती मिळवता येईल.शासनाच्या या आदेशामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत. राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार…
-

विरोधीपक्ष नेतेपद नको!अजित पवारांच्या गुगलीने दिग्गज बोल्ड!!
मुंबई- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोरच मनातील खदखद बोलून दाखवली.मी जक्या वर्षभरात सरकारवर कडाडून हल्ला केला नाही अस काहीजण म्हणतात.आता काय त्यांची गचंडी धरू का अस म्हणत आपल्याला या पदाच्या जबाबदारी मधून मुक्त करा अस अजित पवार म्हणाले. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी…



