News & View

ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत येण्यामुळे माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह – पंकजा मुंडे !

मुंबई- शिवसेना आणि भाजप युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश झाला आणि यामुळे माझ्या अस्तित्वावर आणि मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सतत मी याला भेटले त्याला भेटले याची ऑफर त्याची ऑफर अशा चर्चा सुरू झाल्याने मी दोन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला असा खळबळ जनक खुलासा भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

पंकजा मुंडे यांनी गेल्या दोन दिवसात मुंबईतील वेगवेगळ्या मराठी माध्यमांच्या न्यूज रूम मधील गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर त्या ठिकाणी त्या त्या माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक खुलासा केले मुंबईतक या वृत्तवाहिनीच्या चावडी या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा पारंपारिक विरोधी पक्ष आहे मुंडे आणि पवार यांचे राजकीय वैर महाराष्ट्राने पाहिले आहेत बीड जिल्ह्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच लढत होते अशावेळी अचानक राज्याच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश होतो

त्यानंतर राज्यातील एका मोठ्या नेत्याच्या मतदारसंघाबाबत म्हणजेच माझ्या मतदारसंघाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यापैकी परळीतून कोण लढणार कोण माघार घेणार निवडणुका एकत्रित लढला जाणार का पंकजा मुंडे या नव्या मतदारसंघाचा शोध घेत आहेत का अशा अनेक चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्या माझे कार्यकर्ते समर्थक अस्वस्थ झाले होते माझ्या स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यामुळे यावर विचार करण्यासाठी आणि भविष्यात काय करायचे यासाठी मी दोन महिने रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.

राज्याच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाला सोबत घेताना आपल्याशी कुठलीही चर्चा पक्षीय पातळीवर झाली नाही असं सांगत कदाचित आपण राष्ट्रीय पातळीवर काम करत असल्याने राज्याबाबत आपल्याला विचारले गेले नसावे असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले

मध्य प्रदेशाच्या प्रभारी असतानाही निवडणुकीच्या तिकीट वाट बैठकात आपल्याला दावल्ले गेले का असे विचारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपण परिक्रमा काढले असल्याने त्यात बिझी होतो असे उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *