News & View

ताज्या घडामोडी

बलात्कारातील आरोपी करतोय जिल्हा परिषदेत नोकरी !

बीड- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात दहा वर्षाची शिक्षा झालेला आरोपी आदित्य अनुप धन्वे हा बोगस चारित्र्य प्रमाणपत्र जोडून शासनाची फसवणूक करत तब्बल सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सेवेत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. जिल्हा परिषद सीईओ अविनाश पाठक यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्हा परिषद मध्ये मार्च 2019 साली आदित्य अनुप धनवे हा व्यक्ती अनुकंपावर नोकरीस लागला.सध्या तो विस्तार अधिकारी म्हणून नोकरीस आहे.या कर्मचाऱ्याने नोकरीस रुजू होताना जी कागदपत्रे दिली त्यामध्ये काही कागदपत्रे बोगस दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

26 फेब्रुवारी 2019 रोजी या धनवे वर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले.नुकतीच दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने या प्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

विशेष बाब म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असताना या व्यक्तीने मार्च 2019 मध्ये नोकरीस लागल्यानंतर जे चारित्र्य प्रमाणपत्र दिले त्यात त्याच्यावर एकही गुन्हा नसल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ हे प्रमाणपत्र बोगस जोडले आहे.त्या आधारावर त्याने सहा वर्षे शासकीय सेवा करत पगार व इतर लाभ घेतले आहेत.तसेच शासनाची फसवणूक केली आहे.

सदरील धनवे नामक कर्मचारी हा गेल्या तीन वर्षात तीन वेळा वेगवेगळ्या कारणावरून निलंबित झालेला आहे.

शासनाची फसवणूक करून बोगस कागदपत्रांच्या आधारावर नोकरी मिळणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर सीईओ अविनाश पाठक काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सगळ्या प्रकरणात त्यावेळी अनुकंपावर नोकरीस घेण्यासाठी ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी मदत केली आणि बोगस चारित्र्य प्रमाणपत्र आहे या महितीकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *