News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • वाल्मिक कराडवर मोक्का, हत्या प्रकरणात एस आय टी च्या ताब्यात !

    वाल्मिक कराडवर मोक्का, हत्या प्रकरणात एस आय टी च्या ताब्यात !

    केज -अवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे, तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याचा ताबा एस आय टी कडे देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.प्रोडक्शन वॉरंट दाखवून एस आय टी कराड याचा ताबा घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली. वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी कोर्टाला अवगत केलं. वाल्मिकची मोठ्या…

  • वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !

    वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !

    केज -अवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड ला केज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी ने वाढीव दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आरोपीच्या वकिलाने तपास पूर्ण झाल्याने वाढीव कोठडीची गरज नाही अशी माहिती दिली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी…

  • कोणावर अन्याय व्हायला नको -अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण!

    कोणावर अन्याय व्हायला नको -अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण!

    पुणे -जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या प्रकरणात दोष नसेल तर त्याच्यावर अन्याय होता कामा नये असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकारणावरून विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशावेळी अजित पवार यांनी ठामपणे मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत भूमिका घेतली…

  • सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

    सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

    मुंबई -बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे घडलेल्या हत्येनंतर जिल्ह्यात वातावरण संवेदनशील आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी आरोपीवर कारवाईसाठी आवाज उठवला आहे. यातील आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बीडचे खा बजरंग सोनवणे, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके यांना शासनाच्या वतीने सुरक्षा पुरविण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे खा शरद पवार यांनी…

  • आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!

    आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!

    परभणी -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड याने सरेंडर करण्यापूर्वी त्याच्यावर पुण्याच्या मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु होते असा सनसनाटी आरोप बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केला. परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात परभणीच्या सर्व लोकप्रतिनिधी सह बीडचे आ संदीप…

  • मी राजीनामा का द्यावा -धनंजय मुंडे!

    मी राजीनामा का द्यावा -धनंजय मुंडे!

    मुंबई -स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठेच संबंध नाही, मी त्यात आरोपी नाही मग मी राजीनामा का द्यावा असा प्रश्न उपस्थित करत जे राजीनामा मागत आहेत त्यांना ही मागणी करून समाधान मिळो असा मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंडे हे माध्यमाशी बोलत…

  • वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    केज -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सी आय डी ने अटक केलेल्या आरोपी वाल्मिक कराड याला पुण्याहून थेट केजला नेण्यात आलं. या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केले असता चौदा दिवसांची सी आय डी कोठडी देण्यात आली आहे. वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्याच्या सी आय डी ऑफिस मध्ये शरणागती घेतली. त्या ठिकाणी त्याची प्राथमिक…

  • चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

    चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

    मुंबई -वाल्मिक कराड सरेंडर झाला असला तरी त्यांची 302 च्या गुन्ह्यात घेऊन चौकशी करावी, सीडीआर तपासावे अशी मागणी करत ही केस अंडर ट्रायल चालवावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केली. आ क्षीरसागर यांनी मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

  • फडणवीसांच्या एक्शनमुळे कराड शरण!302 नुसार कारवाई करा – आ धस!

    फडणवीसांच्या एक्शनमुळे कराड शरण!302 नुसार कारवाई करा – आ धस!

    मुंबई -या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना बिन खात्याचे मंत्री ठेवावे अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे आ प्रकाश सोळंके यांनी केली होती असा म्हणत भाजपचे आ सुरेश धस यांनी मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि अवादा कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक एक्शन घेतल्यानेच वाल्मिक कराड यांना सरेंडर…

  • वाल्मिक कराड ला अटक?

    वाल्मिक कराड ला अटक?

    बीड -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड यांना अटक करण्याची मागणी केली जातं होती. केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणावरून गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान या प्रकरणात अवादा कंपनीला…