News & View

ताज्या घडामोडी

Category: महाराष्ट्र

  • नियमाच्या चौकटीतच कामे करा -पंकजा मुंडे!

    नियमाच्या चौकटीतच कामे करा -पंकजा मुंडे!

    जालना-विकासाची कामे करतांना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्यानुसार व नियमानुसार काम करावे. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणुन मी कायदे व नियमाच्या चौकटीतच सामान्य जनतेसाठी काम करणार आहे. सर्व सामान्य लोकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील विविध विभाग आणि क्षेत्रातील समस्या असतील त्या मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे असं पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण व…

  • वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!

    वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!

    बीड -सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. बुधवारी विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक याआधी जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता. बीडच्या मोका विशेष न्यायालयात बुधवारी साडेअकरा वाजता…

  • मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे

    मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे

    शिर्डी – मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे.…

  • अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!

    अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!

    मुंबई -राज्य सरकारने पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली तर अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील. पंकजा मुंडे यांच्यावर जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राज्यभर झालेल्या आंदोलनानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये…

  • संतोष देशमुख केसचा तपास करण्यासाठी तहलियानी यांची समिती!

    संतोष देशमुख केसचा तपास करण्यासाठी तहलियानी यांची समिती!

    मुंबई -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने माजी न्यायमूर्ती एम एल तहलियानी यकच्या समितीची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता या समिती सोबतच सीआयडी आणि एस आय टी देखील या हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी…

  • राष्ट्रवादी काँग्रेस ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त!

    राष्ट्रवादी काँग्रेस ची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त!

    मुंबई -बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. धनंजय मुंडे यांना हा धक्का मानला जातं आहे. बीड जिल्ह्यातील केजचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाने त्याची हकालपट्टी केली होती.दरम्यान सत्ताधाऱ्यांनी देखील या बाबत कारवाई सुरु केली…

  • वाल्मिक कराडवर मोक्का, हत्या प्रकरणात एस आय टी च्या ताब्यात !

    वाल्मिक कराडवर मोक्का, हत्या प्रकरणात एस आय टी च्या ताब्यात !

    केज -अवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे, तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याचा ताबा एस आय टी कडे देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.प्रोडक्शन वॉरंट दाखवून एस आय टी कराड याचा ताबा घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली. वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी कोर्टाला अवगत केलं. वाल्मिकची मोठ्या…

  • वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !

    वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी !

    केज -अवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड ला केज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी ने वाढीव दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आरोपीच्या वकिलाने तपास पूर्ण झाल्याने वाढीव कोठडीची गरज नाही अशी माहिती दिली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी…

  • कोणावर अन्याय व्हायला नको -अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण!

    कोणावर अन्याय व्हायला नको -अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण!

    पुणे -जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या प्रकरणात दोष नसेल तर त्याच्यावर अन्याय होता कामा नये असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकारणावरून विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशावेळी अजित पवार यांनी ठामपणे मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत भूमिका घेतली…

  • सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

    सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

    मुंबई -बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे घडलेल्या हत्येनंतर जिल्ह्यात वातावरण संवेदनशील आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी आरोपीवर कारवाईसाठी आवाज उठवला आहे. यातील आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बीडचे खा बजरंग सोनवणे, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके यांना शासनाच्या वतीने सुरक्षा पुरविण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे खा शरद पवार यांनी…