News & View

ताज्या घडामोडी

teacher 2

संस्थाचालकांवर एसआयटी चे छापे!

बीड -नागपूर शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संस्थाचालक ओंकार अंजीकर याच्या संस्थेवर आणि शाळांवर एस आय टी च्या पथकाने छापेमारी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

शांती निकेतन शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक असलेले ओंकार भाऊराव अंजीकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या शांती निकेतन शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत जय हिंद उच्च प्राथमिक विद्यालय चालवले जाते. एसआयटीने गुलशन नगर येथील जय हिंद विद्यालय येथे छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तपासणी दरम्यान काही शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचे आढळून आले.


एसआयटीच्या छाप्यानंतर शांतीनिकेतन शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक ओंकार भाऊराव अंजीकरचे पाय आणखी खोलात असल्याचे समोर आले आहे. अंजीकर यांनी त्यांच्या संस्थेचे बनावट लेटरहेड वापरुन अपात्र मुख्याध्यापक पराग पुडके यांना पद मिळवल्याची तक्रार केली होती. परंतु आता ते स्वत: एसआयटीच्या चौकशीत अडकले आहेत. अंजीकर यांच्या संस्थेमार्फत तीन शाळा चालवल्या जातात.


अनेक जण अडकणार
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात गाजलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये पोलिसांकडून अपात्र संस्थाचालकांवर अटकेची कारवाई सुरू झाली आहे. तसेच या प्रकरणात शिक्षण विभागातील तत्कालीन कर्मचारी अडकणार आहेत. त्यात शिक्षणाधिकारी, क्लार्क, वेतन अधीक्षक यांच्यासह इतर काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात नियमाप्रमाणे प्रक्रिया न करताच शालार्थ आयडी दिले. त्यामुळे 650 शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस असण्याची दाट शक्यता पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *