Category: परळी
-
पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई !
बीड- परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने जप्तीची कारवाई केली आहे.19 कोटी रुपयांचे साहित्य या विभागाने पोलीस बंदोबस्तात जप्त केले.भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या….
-
कृषी महाविद्यालयाच्या जागेची मुंडेंनी केली पाहणी !
परळी -मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील कृषी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या जागेची पाहणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केली.केवळ घोषणा करून मुंडे थांबले नाहीत तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून तातडीने याबाबतचे आराखडे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.परळी तालुक्यात तब्बल 314 कोटी रुपयांचे हे तीन प्रकल्प लवकरच सुरू होतील असा विश्वास त्यांनी यावेळी…
-
परळीत गोळीबार तीन राउंड फायर !
परळी- चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली. परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे,जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात.या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास…
-
जलयुक्त शिवार घोटाळा,गुत्तेदार, मजूर संस्था काळ्या यादीत !
बीड- जलयुक्त शिवार अभियान मध्ये लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या परळी,अंबाजोगाई सह जिल्ह्यातील दहा ते बारा गुत्तेदार अन मजूर संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.या संस्थांनी आणि गुत्तेदार यांनी चुकीचे पत्ते देऊन शासनाची दिशाभूल केली आहे.त्यामुळे त्यांना नोटीस पाठवणे कठीण जात आहे,अशा सर्व गुत्तेदार आणि मजूर संस्थांवर तातडीने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक…
-
नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषिमंत्री मुंडेंचे आदेश !
परळी-कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नियमानुसार पुढील प्रक्रिया करावी असे निर्देश देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे केले. कृषिमंत्री मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील वाघबेट आणि वेळब…
-
कडा ते परळी धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी बीड जिल्ह्यात जय्यत तयारी !
बीड-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सेना भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते गुरुवारी बीड जिल्ह्यात येत आहेत.त्यांच्या स्वागतासाठी कड्यापासून ते परळी पर्यंत किमान शंभर ठिकाणी मुंडेंच भव्यदिव्य स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.परळीत मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळ- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत…
-
गुरुची विद्या गुरूला परत,मी कच्या गुरूचा चेला नाही- धनंजय मुंडे !
मुंबई – आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
-
अजित पवार उपमुख्यमंत्री !
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शपथ घेतली.त्यांच्यासोबत छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,धर्मराव बाबा आत्राम, यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर आदिती तटकरे ,अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात रविवारी जो भूकम्प आला त्याचे हादरे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस ला बसले.राष्ट्रवादी काँग्रेस मधील…
-
परळीत राडा, एक ठार !
परळी- शहरातील बरकत नगर भागात एका लग्न समारंभात झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले.दोन गटात तुफान राडा झाला.यामध्ये एक जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली. परळी येथील बरकत नगर भागात एक लग्न समारंभ आयोजित केला होता.कन्या शाळा रोड ते बरकत नगर भागात दोन गटात तुफान मारामारी झाली.लग्नातील कार्यक्रमामधून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.दोन गटात…
-
वैद्यनाथ च्या चेअरमन पदी पंकजा मुंडे !
परळी- येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी माजीमंत्री पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्ष पदी चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात दिलजमाई झाली असल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप नेते स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार…