Category: जग
-
लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !
नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी…
-
नितीशकुमार भाजपसोबत !सम्राट चौधरी, विजय सिन्हा होणार उपमुख्यमंत्री !
पटना- बिहारमधील जेडीयु आणि आरजेडी चे सरकार मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले.सकाळी अकरा वाजता नितीशकुमार यांनी राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला.भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार होणार असून भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री होणार आहेत. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून सत्तेत असलेल्या जेडीयु आणि आरजेडी यांच्यात संघर्ष…
-
उत्साह,आनंद,जल्लोषात रामागमन !
राम ऊर्जा,राम देशाची प्रतिष्ठा- मोदी ! अयोध्या – तब्बल पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली अन प्रभू रामचंद्र यांचे आगमन स्वगृही झाले.मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष डॉ मोहन भागवत,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्या उपस्थितीत राम लल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली.राम ऊर्जा आहे,राम देशाची प्रतिष्ठा आहे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
मांजरसुम्बा नजीक अपघातात चार ठार !
बीड- बीड सोलापूर हायवेवर मांजरसुम्बा नजीक असलेल्या ससेवाडी येथे पिकअप आणि कंटेनर यांचा अपघात झाला.या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मांजरसुम्बा पाटोदा रस्त्यावर ससेवाडी या गावानजीक पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण ठार झाले आहेत.अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातातील मृतांची…
-
मध्यप्रदेश राखलं राजस्थान, छत्तीसगड हिसकावल !
नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अर्थात लोकसभेच्या सेमिफायनलमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.मध्यप्रदेश राखताना भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेस कडून हिसकावून घेतली आहेत.मध्यप्रदेश मध्ये तब्बल 162 जागांवर तर राजस्थान मध्ये भाजप 111 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११०, काँग्रेस ७३ तर इतर १६ जागेवर हे…
-
भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!
मुंबई- सलग नऊ सामने जिंकून सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या भारताने न्यूझीलंड चा मोठा पराभव करत विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक केले तर मोहम्मद शमीने सात विकेट घेत भारताला विजयी केले. वानखेडे स्टेडियम येथे नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या.त्यानंतर…
-
भारताने पाकड्याना धूळ चारली !
अहमदाबाद- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने आठव्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.रोहितच्या 86 धावा आणि बुमराह,सिराज,कुलदीप,हार्दिक यांचा अचूक मारा यामुळे भारताने 7 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक…
-
बीडच्या अविनाशने पटकावले सुवर्णपदक !
नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावले.भारताचे दिवसभरातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. अविनाश ने जेव्हा अंतिम रेषा ओलांडली तेव्हा त्याचे प्रतिस्पर्धी चित्रातही नव्हते. भारताचे हे दिवसातील दुसरे सुवर्णपदक आहे आणि सध्या सुरू असलेल्या खेळांमधील साबळेचे पदक हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे १२ वे सुवर्ण आणि हांगझोऊमधील पहिले ट्रॅक…
-
ऐतिहासिक निर्णय ! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर !
नवी दिल्ली- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश इतक्या मोठ्या मताने मंजूर झाले.2026 नंतर जनगणना होईल आणि त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होऊन 2029 पासून याची अंमलबजावणी होईल. केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संसदेत हे विधेयक मांडले.आरक्षणाच्या बाजूनं 454 मते पडली आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक…
-
चंद्राबाबू नायडू ना मुलासह अटक !
आंध्रप्रदेश- आंध्रप्रदेश चे माजी मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे.कौशल्य विकास घोटाळ्यात नायडू यांच्यासह त्यांचे सहा सहकारी आणि मुलाला देखील अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ३ वाजता चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक आल्यावर तेथे जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी…