Category: गेवराई
-
सरसकट विद्यार्थ्यांना मोफत गणवेश नाहीच !
बीड- समग्र शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.मात्र निधी वाटप करताना 300 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे निधी दिला आहे.त्यातही सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाहीये.बीपीएल वरील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार नसल्याने पालकात नाराजी आहे.बीड जिल्ह्यात 1 लाख 14 हजार 993 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी निधी वितरीत…
-
घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !
बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे. बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या…
-
बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !
बीड- ग्रामीण भागातील अनुसूचित जाती च्या कुटुंबांना शबरी आदिवासी योजने अंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यातील 1179 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण…
-
दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य अपात्र !
बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या…
-
गेवराईत ओन्ली भैय्या ! आजी माजींचे डिपॉझिट गुल !!
गेवराई- गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या विरोधात एकत्र येत पॅनल उभा केला होता मात्र मतदारांनी या दोन्ही आजी-माजी आमदारांचे डिपॉझिट गुल करत पुन्हा एकदा बाजार समितीवर अमरसिंह पंडित यांची सत्ता कायम ठेवली आहे त्यामुळे गेवराई ओन्ली…
-
वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!
बीड- राज्यातील ज्या विनाअनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर झाले आहे,त्यांचे प्रस्ताव तपासणीसाठी बीडच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात सध्या जोरात दुकानदारी सुरू आहे.कुलकर्णी,शिंदे,सोनवणे,शेळके,राऊत,हजारे,काकडे,खटावकर या सगळ्यांनी किमान पन्नास आणि कमाल दोन लाखाचा रेट काढल्याने संस्थाचालक बेजार झाले आहेत. बीड जिल्ह्यातील ज्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे अशा किंवा ज्यांना…
-
झुकेगा नही साला म्हणणारे अजित पवार उच्च न्यायालयात गुडघ्यावर आले !
बीड- माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलात तरीही मी निर्णय बदलणार नाही अस म्हणत झुकेगा नही साला म्हणणारे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना उच्च न्यायालयात गुडघ्यावर टेकत माघार घ्यावी लागली.आपल्या हेकेखोर आणि मनमानी स्वभावामुळे 19 गावातील टेंडर प्रक्रिया रद्द करून मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्याचा पवार यांचा घाट न्यायालयाने उधळून लावला.अखेर जुनीच प्रक्रिया…