News & View

ताज्या घडामोडी

जामिनावर सुटताच गर्भपाताचा धंदा सुरू ! गेवराईत मोठ्या कारवाईने खळबळ !!

गेवराई- काही महिन्यांपूर्वी गेवराई शहरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटलेल्या नर्सने पुन्हा तोच उद्योग सुरू केला.जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कारवाईने हा काळा धंदा गुरुवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यात आजही अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.


गेवराई शहरातील संजय नगर परिसरात एका किरायच्या घरात अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली.त्यानंतर बीड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ अशोक बडे व त्यांच्या टिमने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा मारला तसेच या कार्यवाईत गर्भपात करनारी सामग्री व विविध मशीन सह मालकाला व एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

गेवराई शहरात संजय नगर परिसरात अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे प्राप्त झाली. त्यानुसार सदर ठिकाणी खरोखर असा काही प्रकार सुरू आहे का? याबाबत बीड जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी डमी महिला तयार करून फोनवरून याची पुष्टी केली. तसेच या प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखा व वैद्यकीय पथक यांनी सदर ठिकाणी (दि 4 रोजी ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला व याठिकाणी एक महिला व घरमालक त्यांना मदत करनारे दोन लोक असे एकूण चारजण ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. तसेच याठिकाणाहून सोनाग्राफी मशीन व गर्भपात करनारी सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे.

गेवराई शहरात ज्या ठिकाणी ही कारवाई झाली तेथून उपजिल्हा रुग्णालय हाकेच्या अंतरावर आहे,मग येथे असलेले वैद्यकीय अधिक्षक किंवा इतर अधिकारी, कर्मचारी यांना याची माहिती कसकाय नव्हती,की माहिती असूनही तर अर्थपूर्ण दुर्लक्ष करत होते याचीही चौकशी करणे आवश्यक आहे.

तसेच या प्रकरणी पुढील कार्यवाई सूरु असुन आरोपी महिला ही नर्स असुन तिच्यावर काही महिण्यापुर्वी असागुन्ह्यासंदर्भात कारवाई करण्यात आली होती. जामिनवर सुटल्यानंतर तिने हा व्यावसाय परत सुरू केला असल्याचे समजले.

याप्रकरणी मनिषा सानप व तिच्या साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे .सदरची कार्यवाई बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनी सुरेखा धस विधी अधीक्षक मोहम्मद नोमानी, डॉ. रांदड, डॉ. राजेश शिंदे सह अन्यजन र्यवाईत सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *