News & View

ताज्या घडामोडी

Category: गेवराई

  • पंडितांच्या गेवराईत वाळू माफिया माजले, राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय सहकार्यामुळे वाळू तस्करी जोमात!

    पंडितांच्या गेवराईत वाळू माफिया माजले, राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय सहकार्यामुळे वाळू तस्करी जोमात!

    बीड – गेवराई तालुक्यातील गोदाकाठावर वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राजकीय वरदहस्त असल्याने रात्री अपरात्री वाळूची तस्करी केली जातं आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या तोंडावर अन डोळ्यावर पैशाची पट्टी बांधलेली असल्याने कारवाई शून्यच असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यातील बीड आणि गेवराई या दोन तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी आणि सिंदफणा या नदीपात्राला यावर्षी मोठ्या प्रमाणात पूर…

  • बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…

  • जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…

  • पावसाचा धुमाकूळ, वडवणी, आष्टी, गेवराई, शिरूर मध्ये ढगफुटी!

    पावसाचा धुमाकूळ, वडवणी, आष्टी, गेवराई, शिरूर मध्ये ढगफुटी!

    बीड: जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा धुमाकूळ; आष्टी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी, 30 गावांचा संपर्क तुटला आहे.गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या 32 गावात पाणी शिरलं आहे, तर वडवणी आणि डोंगर पट्याचा संपर्क तुटला आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले…

  • राक्षसभुवन, पांचांळेश्वर पाण्याखाली!32 गावांना सतर्कतेचा ईशारा!

    राक्षसभुवन, पांचांळेश्वर पाण्याखाली!32 गावांना सतर्कतेचा ईशारा!

    गेवराई -पैठण येथील जायकवाडी धरण जवळपास ९७ टक्के भरले असून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याचा प्रवाह नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुरू असल्याने धरणातून गोदावरी नदीत १ लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदी तीरावरील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेले शनी मंदिर व…

  • गेवराईत तणाव, लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक!

    गेवराईत तणाव, लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक!

    बीड – ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराई मध्ये राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी तुफान दगडफेक केली यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज करत या कार्यकर्त्यांना पांगवले. यामुळे काही काळ गेवराई मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रा लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके…

  • छत्रपती च्या ठेवीदाराची शाखेसमोर आत्महत्या!

    छत्रपती च्या ठेवीदाराची शाखेसमोर आत्महत्या!

    बीड -गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट च्या शाखेसमोर सुरेश जाधव या ठेवीदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चेअरमन संतोष भंडारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भंडारी यांनी अनेक दिवसापासून ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. कविता सुरेश जाधव (वय 35) यांनी म्हटले आहे की, मी व माझे पती सुरेश…

  • एका अपघातात बचावले, दुसऱ्यांदा नियतीने डाव साधला!

    एका अपघातात बचावले, दुसऱ्यांदा नियतीने डाव साधला!

    गेवराई – अपघातग्रस्त वाहनातुन उतरत असताना  सहा मित्रांना आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराई नजिक घडली. मृत सहा तरुण गेवराई शहरातील रहिवाशी आहेत. गेवराई येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ झालेला हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला… जिकडे तिकडे रक्त होतं. या अपघातानंतर गेवराईमध्ये…

  • रोकडेश्वर जन्मोत्सवनिमित्त यंदा वस्त्रहरण चा प्रयोग!

    रोकडेश्वर जन्मोत्सवनिमित्त यंदा वस्त्रहरण चा प्रयोग!

    बीड-गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे पारंपारिक पद्धतीने चकलांबा या गावात चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री रोकडेश्वर जयंती साजरी केली जाते यानिमित्त श्री रोकडेश्वर प्रसादिक नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग आयोजित केला जातो तीन दिवशीय असलेल्या या उत्सवासाठी रसिक प्रेक्षकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. चकलांबा या गावात गेल्या 141 वर्षापासून अखंडितपणे…

  • सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!

    सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!

    बीड -जिल्ह्यातील शिरूर आणि गेवराई तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या सिंदफना नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे प्रकल्पाचे बॅरेजमध्ये रुपांतरीत करण्याच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी…