News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ ‼दिनांक २० सप्टेंबर २०२४‼ मेष राशी .तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मुलांबरोबरचे आपले नातेसंबध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या.…

  • बनावट नोटाप्रकरणी बीडमध्ये छापे!

    बनावट नोटाप्रकरणी बीडमध्ये छापे!

    बीड -बीड शहरात काही दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शहरातील विविध चौदा ठिकाणी छापे घातले. यामध्ये एका आरोपीस अटक केली आहे, सनी आठवले सह दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा चलनात वापरल्या प्रकरणी दोघा जणांना…

  • ‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश!

    ‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश!

    नवी दिल्ली -बीडच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची गंभीर दखल केंद्र सरकारने लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. ‘ज्ञानधारा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत.…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक १९ सप्टेंबर २०२४. मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा…

  • ज्ञानराधाच्या ठेवीदारावर गोळीबार!

    ज्ञानराधाच्या ठेवीदारावर गोळीबार!

    बीड – तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी देशात गाजत असलेल्या बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी बाबत खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे कुटे यांच्या कंपनीला भेट देण्यासाठी गेलेल्या ठेवीदारावर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. वैजापूर तालुक्यातील काही खातेधारकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट…

  • संघाच्या संस्थेला लागली भ्रष्टाचाराची वाळवी!पाळे मुळे कोण खणून काढणार!

    संघाच्या संस्थेला लागली भ्रष्टाचाराची वाळवी!पाळे मुळे कोण खणून काढणार!

    बीड – गेल्या चार पाच दशकापासून मराठवाडा सह इतर भागात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने नावलौकिक मिळवलेल्या संघप्रणित एका शिक्षण संस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. किमान पंचवीस लाख ते जास्तीत जास्त एक कोटी पर्यंत टेबल खालून घेऊन या संस्थेतील वाहकाची जबाबदारी असणाऱ्याने करोडोची माया जमवली आहे. विशेष म्हणजे याची तक्रार संघाकडे देखील करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेत…

Exit mobile version