बीड -बीड शहरात काही दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शहरातील विविध चौदा ठिकाणी छापे घातले. यामध्ये एका आरोपीस अटक केली आहे, सनी आठवले सह दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
बीड शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा चलनात वापरल्या प्रकरणी दोघा जणांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना बीड शहर, शिवाजीनगर, पेठ बीड आणि बीड ग्रामीण च्या पोलिसांच्या पथकांनी माळीवेस, सुभाष रोड, जिजामाता चौक या भागात छापे घातले.
या प्रकरणी पोलिसांनी महेश आठवले, सनी आठवले आणि मनेश क्षीरसागर या तिघांच्या घरी छापे घातले. महेश आठवले यास अटक केली आहे तर इतर दोन आरोपी फरार झाले आहेत. या तिन्ही आरोपीच्या घरी कुकरी, चाकू, खंजीर असे शस्त्र सापडले.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, पोलिसांच्या या कारवाईने शहरात एकच खळबल उडाली आहे.
Leave a Reply