News & View

ताज्या घडामोडी

IMG 20261012 WA0014

चंपावतीचा फरार मुख्याध्यापक जोशी पोलिसांना सापडेना!एलसीबी कडे तपास देण्याची मागणी!

बीड -पटसंख्या मॅनेज करण्यासाठी आणि अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी बोगस विद्यार्थी खरेदी विक्री करणाऱ्या चंपावती शाळेचा निलंबित मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले. तरीदेखील शिवाजीनगर पोलिसांना आरोपीचा शोध लागतं नाहीये. त्यामुळे हा तपास एलसीबी कडे वर्ग करावा म्हणजे आरोपीला तात्काळ अटक होईल अशी मागणी होतं आहे.

बीड येथील चंपावती शाळेत उत्तराखंड येथील तीन विद्यार्थी यांचे प्रवेश असल्याचे उघड झाले आणि एकच खळबळ उडाली. पटसंख्या मॅनेज करण्यासाठी चंपावती शाळेने या तीन विद्यार्थ्यांसोबतच तब्बल 295 अतिरिक्त विद्यार्थी दाखवल्याचे शिक्षण विभागाच्या तपासात समोर आले.

त्यानंतर या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी प्रणिता गंगाखेडकर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसात 15 ऑक्टोबर रोजी सारंग जोशी याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यापूर्वी तीन दिवस अगोदर संस्थेने त्याला सेवेतून निलंबित केले.

गुन्हा दाखल झाल्यापासून शिवाजीनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र अद्याप तो सापडलेला नाही.

एकीकडे जिल्ह्यात कुठेही चोरी, दरोडा, खून, बलात्कार सारख्या घटना घडल्या तरी चोवीस तासात आरोपीना जेरबंद केले जाते. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा रेकॉर्ड कौतुकास्पद आहे. सोने चोरी असो कि वाहन चोरी एलसीबी छटा टीमने अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपीना अटक केली आहे.

मात्र दुसरीकडे शिवाजीनगर पोलिसांना एक माजी मुख्याध्यापक सापडत नसेल तर त्याचा तपास एलसीबी कडे द्यावा, ते तातडीने त्याला बेड्या ठोकतील अशी चर्चा जनतेत होतं आहे.

जॉईन झाल्यावर चार वर्षांनी मेडिकल!

सारंग जोशी याला चंपावती शाळेत 2015 साली नोकरी लागली, त्यानंतर एक महिन्यात त्याचे फिटनेस आणि मेडिकल सर्टिफिकेट सादर होणे अपेक्षित आहे. मात्र तब्बल चार वर्षांनी त्याचे मेडिकल सर्टिफिकेट दाखल करण्यात आले आणि संस्थेने ते मान्य केले. हा प्रकार गंभीर असून याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version