News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण प्रथमा
🌸 नक्षत्र…. पु. भाद्रपदा
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. २९ ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०८ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४८ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक २९ आँगस्ट २०२६‼️

मेष: चांगला दिवस आहे. चंद्र लाभस्थानात आहे. नविन कल्पना सुचतील. कामामध्ये चांगली प्रगती साधेल. आनंददायक घटना घडतील. आर्थिक कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

वृषभ: नविन कामामध्ये सावधगिरीने व्यवहार करावेत. संयमाने काम घ्या. संवाद वाढवा त्यातून नविन माहिती मिळेल जी व्यवहारासाठी उपयुक्त असेल.

मिथुन: कौटुंबिक जीवन आनंदी असेल. मतभेद दूर होण्यासाठी सकारात्मकतेने विचार करा. मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. नियोजित कामात गती मिळेल.

कर्क: आपल्या वाढत्या प्रतिष्ठेने व्यावसायिक क्षेत्रात नवे यश मिळेल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम घडू शकतो.

सिंह: उत्साहाने कामाला सुरुवात करा. सुट्टीचा दिवस असला तरी कामामध्ये व्यस्त राहाल. प्रवासाचे योग आहेत. मित्र सहकार्‍यांचे सहकार्य लाभेल.

कन्या: नविन जबाबदारी वाढू शकते. नविन करार कामामध्ये सुधारणा होईल. आर्थिक स्थितीत काही बदल होतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. घरात खेळीमळीचे वातावरण असेल.

तूळ: उपासना लाभदायक होईल. नियोजित कामामध्ये यश प्राप्त होईल. प्रवास कार्यसाधक होतील. मित्रांच्या भेटीगाठीने आनंदात भर पडेल.

वृश्चिक: मनाविरुध्द काही घटना घडू शकते. सकारात्मक राहा हितशत्रूं पासून सावध राहा. वाणीमध्ये संयम ठेवा. ध्यान धारणा प्राणायाम करून मनाला प्रसन्न ठेवा.

धनु: नविन ओळखीतून मित्रांकडून भागीदारीतून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. कामे मार्गी लागल्याने आर्थिक उलाढाल मनाजोगी संभवते.

मकर: नविन जबाबदारी स्विकारतांना तणाव होणार नाही याची काळजी घ्यावी. आज कामाचा व्याप जास्त असेल. सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. प्रतिष्ठा सन्मान मिळू शकते.

कुंभ: आनंदी दिवस आहे. नविन कामामध्ये आपल्या मताला विशेष महत्व असेल. सर्जनशीलतेसाठी योग्य काळ. मनोरंजनाचा आनंद घ्याल. मित्र सहकारी यांबरोबर चांगला दिवस आहे.

मीन: घरातील संवादावर लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. संवादामुळे घरातील तणाव कमी होईल. ध्यान प्राणायाम करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version