News & View

ताज्या घडामोडी

20260825 114857 scaled

भुमाफियानी करपरा नदी केली गिळंकृत!

बीड – बीडच्या भूमाफियांनी अक्षरशः नदीपात्र गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष बाब म्हणजे नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेत नदीवर करण्यात आलेले अतिक्रमण अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील सुमती नगर भागात करपरा नदीच्या मधोमध भिंत घालून भूमाफियांनी नदी गिळंकृत करत प्लॉटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या नदी संरक्षण आणि संवर्धन यासाठी अहोरात्र मेहनत घेत असताना त्यांच्याच बीडमध्ये मात्र नदी गिळंकृत करण्यासाठी शासकीय अधिकारी हातभार लावत आहेत.

बीड शहरातील सुमती नगर भागामध्ये स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या समाधीच्या दक्षिण बाजूस एक सिमेंटचा पूल बांधण्यात आलेला आहे या मुलाखालून वाहणाऱ्या करपरा नदीमध्ये मधोमध भिंत घालून नदी गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही भूमाफियांनी सुरू केला आहे.

20260825 1149155788875487495250751

वरील छायाचित्रांमध्ये आपण जे पाहतो आहोत ते करपरा नदीचे पात्र असून यामध्ये नदीच्या कडेने संरक्षण भिंत बांधण्याऐवजी भूमाफियांनी मधोमध अनधिकृत पणे भिंत बांधण्यास सुरुवात केली असून खोदकाम देखील पूर्णपणे उरकण्यात आले आहे.

20260825 1148452253890854694619241

या दुसऱ्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की हा जो करपरा नदीवरील पूल आहे या फुलाचे तीन दरवाजे या संरक्षण भिंतीसाठी बंद करण्याचा घाट भूमाफियांनी घातला आहे.

20260825 1149095191682280721390683

करपरा नदीच्या या पात्राशेजारी दक्षिणेकडून 30 फूट आणि उत्तरेकडून दहा ते पंधरा फूट नदी वर अतिक्रमण करण्यात आलेले आहे यासाठी नदीचे पात्र पूर्णपणे वळवून त्यामध्ये भराव घालून त्या ठिकाणी प्लॉटिंग तयार करण्यात आली असून हे प्लॉट देखील विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बीडचा नगररचना विभाग म्हणजे पैसे द्या आणि सरकारी जमीन नदी नाले ओढे मोकळे प्लॉट आपल्या नावावर करून घ्या असा आजचा धंदा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या नगर रचना विभागात सर्वसामान्य माणूस एखादी माहिती घ्यायला गेला तर त्याला फेटे घालायला लावले जातात आणि दुसरीकडे पैसे देणारे भूमाफिया प्लॉटिंग वाले यांच्यासमोर रेड कार्पेट टाकून नदी नाले ओढे त्यांच्या नावाने करून दिले जातात याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे.

नदी शेजारील शेत विकत घ्यायचे आणि नंतर नदीमध्ये भराव घालून अतिक्रमण करत प्लॉटिंग पाडून नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागाकडून चिरीमिरी देत मोजणी करून घ्यायची आणि शासनाची फसवणूक करत नदीवरच अतिक्रमण करायचे असाच डाव येथील भूमाफियांनी रचल्याचे उघड झाले आहे.

केवळ सुमती नगर मध्ये करपरा नदी बुजवून झालेले अतिक्रमण हा प्रकार उघडकीस आला असला तरी देखील पालवण पासून ते सुमती नगर पर्यंत अनेक ठिकाणी भूमाफियांनी ही नदी बुजवून टाकलेली असून नदीच्या दोन्ही बाजूने असलेले रस्ते प्लॉटिंगमध्ये घालून शासनाची फसवणूक केली आहे  याची तपासणी महसूल विभागाकडून होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version