News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण शुक्ल अष्टमी
🌸 नक्षत्र…. विशाखा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. २० ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/०३ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०१ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक २० आँगस्ट २०२६‼️

मेष: कामामध्ये प्रगतीकारक दिवस आहे. देवाण घेवाणीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक घाई टाळा. गणेश दत्त उपासना लाभदायक होईल.

वृषभ: निर्णयक्षमतेचा उपयोग करा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. जुन्या मित्राकडून एखाद्या कामामध्ये सहकार्य लाभेल. संकल्पपूर्तीसाठी मेहनत घ्यावी लागेल.

मिथुन: वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. अनावश्यक संशयीवृत्ती सोडा. संवादकौशल्यामुळे कामे पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला लाभ मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल. भेटीगाठीतून आनंद मिळवाल.

कर्क: चांगला दिवस आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नविन कामाची जबाबदारी मिळेल. मनाची प्रसन्नता राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

सिंह: उत्साहपूर्वक चामामध्ये प्रगती साधाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सन्मान प्रतिष्ठा प्राप्त कराल. प्रवासातून लाभ होतील. संवादातील मर्यादा लक्षात घ्या.

कन्या: नियोजनपूर्वक कामामध्ये लक्ष द्यावे. जुनी अर्धवट कामे पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या नियोजनामध्ये कुटुंबियांचे योगदान लाभेल. आर्थिक लाभ होतील.

तुळ: नविन योजना आखाल त्या प्रत्यक्षात येण्यासाठी विचारपूर्वक कृती करा. भागीदारीच्या कामात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्यावे.

वृश्चिक: उत्साह व आत्मविश्वासपूर्वक कार्य संपादन कराल. घाईत निर्णय टाळा. कौशल्यपूर्ण कल्पकतेने काम केल्यास यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चांगली संधी मिळेल.

धनु: तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक होईल. प्रवास कार्यसाधक होतील. दूरच्या नातेवाईकाकडून मित्राकडून चांगली बातमी कळेल. भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात प्रगती होईल.

मकर: कामामध्ये प्रगतीशील घटना घडतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल. आर्थिक कामे होतील. आध्यात्मिक लाभ होतील. सुसंवाद साधावा अनावश्यक मतभेद टाळा.

कुंभ: समाधानकारक दिवस आहे. मित्र सहकारी अपेक्षित मदत करतील.
आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. संधींचा योग्य उपयोग करा. जवळचे प्रवास संभवतात.

मीन: नियोजित कामे पूर्ण होतील. नविन कामामध्ये प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक लाभ होतील. कल्पनेतील विचारांना चालना मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version