News & View

ताज्या घडामोडी

BEED CRIME NEWS

बीडमध्ये गोळीबार, एक आरोपी अटक!

बीड -शहरातील इमामपूर रोड परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. गेल्या काही दिवसात गोळीबाराच्या घटनेत झालेली वाढ चिंताजनक आहे.

सलीम पेट्रोलपंप, इमामपूर रोड, बीड येथे ही घटना घडली. फिर्यादी शेख मोहम्मद साद शेख हारुण (वय 22, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांच्या तक्रारीवरून सफवान खान महेबुब खान, सय्यद साद, फरदीन, अखलाख (सर्व रा. पेठबीड) यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बीएनएसच्या कलम 109, 118(1), 189(2), 190, 191(2), 191(3) तसेच आर्म्स ॲक्टच्या कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 300/2026 असून पुढील तपास सपोनि दराडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी इमामपूर रोडवरील घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version