News & View

ताज्या घडामोडी

tukaram mundhe

शाळा परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी!

पुणे -राज्यातील सर्वच शाळांच्या पन्नास मिटर परिसरात जंक फूड, डेअरी प्रॉडक्ट, पॅकिंग प्रॉडक्ट विकण्यास अन्न व औषधी विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बंदी घातली आहे. राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी यामध्ये दिल्या जाणाऱ्या आहाराबाबत सुद्धा मुंडे यांनी कडक निर्देश दिले आहेत.

नवीन नियमांनुसार राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हे नियम लागू राहतील. शाळेचे कँटीन, मध्यान्ह भोजन पुरवठादार, वसतिगृहातील मेस तसेच अंगणवाडीपासून बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना अन्न देणाऱ्या सर्व संस्थांकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा (FSSAI) वैध परवाना असणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवाना नसलेल्या कोणत्याही पुरवठादाराकडून अन्न खरेदी करता येणार नाही.विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी विकसित करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेच्या आवारापासून ५० मीटरच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि हाय शुगर (HFSS) असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच अशा पदार्थांच्या जाहिराती करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापनावर असेल. शाळांनी परिसरातील स्थितीवर लक्ष ठेवून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहाराबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे.
‘ईट राईट स्कूल’ संकल्पना अनिवार्य राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘ईट राईट स्कूल’ ही संकल्पना राबवणे बंधनकारक केले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पौष्टिक आहाराची माहिती दिली जाईल. तसेच, शाळांमध्ये अन्न सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत का, याची नियमित तपासणी केली जाणार आहे.
FDA कडून प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा अन्न तपासणी केली जाईल. या प्रक्रियेत अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्यांची गुणवत्ता तपासली जाईल.नवीन धोरणानुसार प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी बोर्ड असणे आवश्यक आहे. तसेच, अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी फूड सेफ्टी सुपरवायझरची नियुक्ती करावी लागेल. याशिवाय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि स्वयंपाकघरात उच्च दर्जाची स्वच्छता राखणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

समोसे, कचोरी, भजी, फ्रेंच फ्राईज आणि फ्राईड चिकन. (हे पदार्थ वारंवार वापरलेल्या तेलात किंवा वनस्पती तुपात बनवले जात असल्याने आरोग्यास अत्यंत घातक मानले जातात.)

बेकरी उत्पादने: केक, पेस्ट्री, कुकीज, बिस्किट्स आणि डोनट्स.

पॅक केलेले स्नॅक्स: मायक्रोवेव्हमध्ये बनवले जाणारे पॉपकॉर्न आणि फ्रोजन पिझ्झा.

फॅट्स आणि स्प्रेड्स: वनस्पती तूप (डाल्डा) आणि स्टिक मार्जरीन.

इतर घटक: नॉन-डेअरी कॉफी क्रीमर आणि केकसाठी वापरले जाणारे रेडीमेड फ्रॉस्टिंग/आइसिंग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version