News & View

ताज्या घडामोडी

New Project 2026 07 28T083348.691

शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेत्याला अटक!बीडमध्येही चौकशी सुरु!

नाशिक -एकाच दिवसात तब्बल 177 शालार्थ आयडी तयार करून त्यांना नोकरी देणाऱ्या भाजप नेत्याला बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा नेता मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित असल्याची माहिती आहे. ज्याप्रमाणे या नेत्याने एकाच दिवशी हर बोगस आयडी काढले त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यात देखील काही संस्थाचालक, कार्यवाह आणि सहकार्यवाह यांनी एकाच दिवशी 50 पेक्षा अधिक शालार्थ आयडी काढले असून त्यांची देखील चौकशी सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन समर्थक शिक्षणसंस्था चालक संजय गरुड यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गरुड हे तपास यंत्रणेला हवे होते. अखेर दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर नाशिकच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय गरुड यांच्याशी संबंधित शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील १७७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. शालार्थ प्रणालीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आयडी एका दिवसात तयार होणे संशयास्पद मानले जात असून, याच मुद्द्यावरून तपास यंत्रणेने सखोल चौकशी सुरू केली आहे. या आयडींच्या आधारे शासनाकडून वेतन अथवा इतर आर्थिक लाभ उचलण्यात आले का, निधी कोणाच्या खात्यात गेला, संबंधित कागदपत्रे आणि मंजुरीची प्रक्रिया कशी पार पडली, याचा तपास एसआयटी करत आहे. या व्यवहारांद्वारे नेमका किती आर्थिक गैरव्यवहार झाला, याबाबत अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नसला तरी तपास यंत्रणा आर्थिक व्यवहारांची तपशीलवार छाननी करत आहे.
मराठवाड्यात शैक्षणिक जाळे पसरलेल्या ऐका शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह यांनी आपल्या संस्थेसोबत इतर संस्थेमध्ये देखील एकाच दिवशी किमान पन्नास पेक्षा अधिक आयडी जनरेट केल्याची माहिती आहे. 2012 ते 2024 या काळात तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना हाताशी धरून हा घोटाळा करण्यात आला आहे. माजी शिक्षणाधिकारी देवगुडे यांच्या काळापासून ते नागनाथ शिंदे यांच्याशी कार्यकाळापर्यंत बहुतेक शिक्षणाधिकारी यांनी यात हातभार लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय गरुड यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या चार तालुक्यांमध्ये एकूण १५ माध्यमिक शाळा सध्या कार्यरत आहेत. याशिवाय शेंदुर्णी येथे दोन कनिष्ठ महाविद्यालये, वाकोद येथे एक कनिष्ठ महाविद्यालय आणि शेंदुर्णी येथे एक वरिष्ठ महाविद्यालय आहे. या संस्थांशी संबंधित शालार्थ नोंदी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. तपास पथकाचे सहायक आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना संजय गरुड सोलापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने दोन दिवस सोलापूर परिसरात शोधमोहीम राबवली. संशयित वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्यांचा माग काढणे आव्हानात्मक ठरत होते. मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित गरुड हे नातेपुते येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने एका फ्लॅटवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version