News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल तृतिया/चतुर्थी
🌸 नक्षत्र…. मघा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. १७ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️दिनांक १७ जुलै २०२६‼️

मेष:- आत्मविश्वासपूर्वक केलेल्या कामात यश मिळेल. मित्र भागिदार यांच्या सहकार्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. कुलदेवी उपासना करावी.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. नवनविन कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. योग्य नियोजनामुळे चांगले यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल मेहनतीचे चांगले फळ मिळेल.

मिथुन:- कलात्मक कौशल्याने यश मिळवाल. भाग्याची साथ लाभेल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. नवनविन ज्ञान संपादन करण्याचे प्रयत्न सफल होतील.

कर्क:- आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. निश्चयपूर्वक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. सामाजिक कामामध्ये नावलौकिक मिळवाल.

सिंह:- मनाची चंचलता असेल धरसोडवृत्तीमुळे निर्णयक्षमता आज कमी होईल. अनावश्यक खर्च टाळा. गुप्तयोजना साकारण्यात यश मिळेल. आध्यात्मिक उपासना घडेल.

कन्या:- चांगला दिवस आहे. भेटीगाठीतून नविन ओळखी होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी लाभदायक ठरतील. अपेक्षित कार्यपूर्तीमुळे समाधान लाभेल.

तुळ:- नियोजित कामामध्ये नविनसंधी प्राप्त होईल. वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. प्रतिष्ठा सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

वृश्चिक:- संयमाने घेतल्याने चांगले फळ मिळेल. नातेसंबंधात सुधारणा होईल. वाणीमध्ये मृदुता ठेवावी त्यामुळे भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.

धनु:- व्यवहारात सावधानता बाळगा विचारपूर्वक निर्णय घ्या. गूढ विषयाची आवड निर्माण होईल. कुलदेवीची उपासना लाभदायक होईल. सकारात्मक राहा.

मकर:- सकारात्मक चर्चेतून भागीदारीच्या कामात यश मिळेल. मित्र जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मैत्रीसंबंध अधिक दृढ होतील. पुढील कामाचे नियोजन कराल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

कुंभ:- नविन जबाबदारी वाढेल त्यामुळे कामाचा व्याप वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आपल्या कामातील नियमितपणा लाभदायक ठरेल. नविन नातेसंबंध जुळतील.

मीन:- अनुकूल दिवस आहे. यात्रा देवदर्शनासाठीचे नियोजन होऊ शकते. प्रीयकडून आनंददायक बातमी मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आर्थिक कामे होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version