अंबाजोगाई –महावितरण चा अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता मनिष ढाकरे याला पाच हजार रुपयाची लाच घेताना जेरबंद करण्यात आले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खात्री केल्यानंतर सापळा लावण्यात आला. यामध्ये संबंधित कार्यकारी अभियंता मनिष ढाकरे याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर त्याला पाच हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.





Leave a Reply Cancel reply