बीड – अन्न व औषध प्रशासन विभाग बीडच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे छापा घालून 35 हजार रुपयांचा बनावट खवा व केमिकल जप्त केले गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर सहित जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दूध दही खवा पेढे या सहित हॉटेल मध्ये देखील भेसळ होते हे उघड आहे मग आता धाडी टाकणारे एफडीएवाले इतकी वर्ष झोपले होते का की दर महिन्याला हप्ता येत असल्यामुळे त्यांचे तोंड आणि हात बांधलेले होते अशी चर्चा सुरू झाली आहे.
बीडच्या अन्न व औषध प्रशासनाने शिरूर कासार तालुक्यातील दहिवडी येथील कृष्णा केक बर्फी या व्यापारी प्रतिष्ठान वर छापा घालून मिल्क केक ब्राऊन बर्फी खवा रिफाइंड पामतेल आणि सॅफोलाईट नावाचे रंगात मिसळले जाणारे केमिकल जप्त केले.
ही कारवाई केल्यानंतर बीडच्या विभागाने स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला मात्र दहिवडी येथील हा खवा तयार करण्याचा कारखाना असो किंवा बीड जिल्ह्यातील माजलगाव बीड गेवराई आंबेजोगाई परळी आष्टी या ठिकाणी विक्री होणारे दूध खवा दही गुटखा याकडे एफडीएने इतकी वर्ष का लक्ष दिले नाही असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यातील हजारो मेडिकल पैकी किती मेडिकलवर यांनी तपासणी केली अथवा कोणकोणत्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची तसेच इतर पदार्थांची तपासणी केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीडचे अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे केवळ नावालाच होते दर महिन्याला काही व्यापाऱ्यांकडून किंवा त्यांच्या मुकादम कडून हप्ता घ्यायचा आणि कुठलीच कारवाई करायची नाही असा प्रकार सुरू होता.
या विभागाच्या आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे रुजू झाल्यानंतर काही ना काही कारवाई त्यांच्या जिल्ह्यात दाखवायची म्हणून बीडचा विभाग कामाला लागल्याचे नाटक करत आहे मात्र प्रत्यक्ष शहरातील बस स्थानक आणि मुख्य चौकांमध्ये उघड्यावर विक्री होणारे अंडा आमलेट भेळ नाष्टा सेंटर यांच्यावर कोण कारवाई करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.





Leave a Reply Cancel reply