बीड – कोणताही चोर दरोडेखोर हा त्याला मजा येते म्हणून किंवा तो त्याचा पारंपारिक उद्योग व्यवसाय आहे म्हणून चोऱ्या करत नाही किंवा दरोडे घालत नाही त्याची काहीतरी मजबुरी असते म्हणूनच त्याच्यावर चोरी करण्याची किंवा दरोडे घालण्याची वेळ येते.मात्र लाखो रुपयांचा पगार दर महिन्याला खात्यात जमा होत असतानाही शासकीय तिजोरीवर दरोडे घालणारे जे व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थान दुरुस्तीवर झालेल्या 93 लाखाच्या खर्चा नंतर उपस्थित होत आहे.
बीडच्या पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थान दुरुस्तीवर तब्बल 93 लाख रुपये खर्च करण्यात आला याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांनी हात झटकत आपल्या कार्यालयाने केवळ अंदाजपत्रक तयार करून दिल्याचे सांगितले या दुरुस्तीवरील खर्च हा पोलीस कल्याण निधीमधून करण्यात आल्याचे त्यांनी सांगत आपली जबाबदारी झटकली.
1965 स*** या निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले होते त्यामुळे या ठिकाणी दुरुस्ती करणे आवश्यक होते असा अहवाल तोंडे यांच्या कार्यालयाने दिल्यानंतर अंदाजपत्रके तयार केली गेली आणि यामध्ये सगळ्यांनीच मलिदा खाल्ला. परंतु कार्यकारी अभियंता असलेल्या तोंडे यांना या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे का गरजेचे वाटले नाही हा मूळ प्रश्न आहे तसेच या कामाचे पूर्वीचे फोटो आणि दुरुस्ती केल्यानंतर चे फोटो का दिले जात नाहीत हा देखील एक प्रश्नच आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात किंवा जिल्ह्यात एखादा दरोडा पडला किंवा चोरी झाली तर 24 तासाच्या आत आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस धावपळ करतात या आरोपींना अटक केल्यानंतर त्याची क्रेडिटही पोलीस घेतात. परंतु या आरोपींवर चोरी किंवा दरोडे घालण्याची वेळ का आली याचा कोणीही विचार करत नाही त्यांना पकडून शिक्षा केली जाते मग हाच न्याय शासकीय तिजोरीतील लाखो करोडो रुपये बोगस कामाच्या माध्यमातून स्वतःच्या खिशात घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना का लावला जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एरवी कुठलीही घटना किंवा एखादा गुन्हा उघडतेस आणण्यात यश आल्यानंतर स्वतःची पाठ थोपटून घेत वाहवा करून घेणारे पोलीस अधीक्षक हे 93 लाखाच्या दुरुस्तीच्या बाबत मात्र आजपर्यंत गप्प आहेत साधी प्रेस नोट देखील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून काढली गेलेली नाही नवीन पोलीस अधीक्षक रुजू झाले की निवासस्थान आणि कार्यालयावर लाखो रुपये खर्च केल्याचे दाखवले जाते असे असतानाही स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणून घेणाऱ्या पोलीस अधीक्षकांनी नव्याने 93 लाख रुपये का खर्च केले आणि एवढा मोठा खर्च करायचा होताच तर नवा बंगलाच का बांधला नाही असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक यांचे निवासस्थान आणि त्यावर झालेला 93 लाख रुपये खर्च हा विषय सर्व वर्तमानपत्रात सोशल मीडियावर गाजत असताना सहापैकी एकही आमदार याबाबत विधिमंडळात का आवाज उठवत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे या लोकप्रतिनिधींचे काही कुटाने तर पोलीस अधीक्षकांच्या हातात नाहीत ना अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.





Leave a Reply Cancel reply