News & View

ताज्या घडामोडी

file 00000000c1bc7207ae6e8a80e3403ebf

बोगस भरती, नीट पेपरफुटी ‘मुळे ‘अमृत महोत्सव साजरा करणारी संस्था डागाळली!

बीड -एखादी संस्था, पक्ष, संघटना यांचा अमृत महोत्सव साजरा केला जातं असताना त्याला संस्थेचे कार्य, मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा, संघर्ष याबाबत आदराने बोलले जाते. मात्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही अशी संस्था आहे जिचा अमृत महोत्सव साजरा होतं असताना संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष असोत कि विद्यमान कार्यवाह अथवा माजी सहकार्यवाह यांच्या कारभाराबद्दल आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

तब्बल 75 वर्षांपूर्वी संघ आणि समविचारी लोकांनी  एकत्र येतं मराठवाड्यात भारतीय शिक्षण प्रसारक संस्था नावाने सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या मुलांसाठी शिक्षणाची दार खुली केली.केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे हे ब्रीद घेऊन उभा राहिलेल्या या संस्थेला स्व प्रमोद महाजन, स्व गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय आणि आर्थिक पाठबळ मिळालं आणि संस्थेचा विस्तार झाला.

मराठवाड्याच्या कानकोपऱ्यात दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून या संस्थेचे नाव घेतलं जाऊ लागलं.मात्र प्रत्येक संस्थेत काही नालायक लोक असतात, त्यांचा कारभार संस्थेला बदनाम करण्यास कारणीभूत ठरतो. अशाच पद्धतीने या संस्थेत काही बांडगुळ तयार झाली आणि त्यांनी संस्थेला नासवण्यास सुरवात केली.

शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यापासून ते मंत्र्यापर्यंत अनेकांना मॅनेज करण्यात हातखांडा असलेले आणि संस्थेत साधारण शिक्षक असतानाही सहकार्यवाह म्हणून मिरवणाऱ्या माणसाने बोगस आणि भ्रष्ट कारभाराला कळस गाठला. Je je अध्यक्ष आणि कार्यवाह असतील त्यांना त्यांना मॅनेज करत या महाशयानी आपल उखळ पांढरं करून घेतलं.

गेल्या काही वर्षात ज्या संस्थेबद्दल आदराने बोललं जायचं आज त्याच संस्थेचे नाव निघालं कि लोक भ्रष्टाचार चे अनेक किस्से सांगतात. याच संस्थेच्या माजलगाव येथील सिद्धेश्वर शाळेत ऍडमिशन साठी डोनेशन घेताना तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर बीडच्या शाळेत एका शिक्षकाने अश्लील चाळे केल्याप्रकरणी फटके खाल्ले होते अशी चर्चा गावभर झाली होती.

या संस्थेत सहकार्यवाह असणाऱ्या नाना कळा अंगी असलेल्या व्यक्तीने तब्बल 154 लोकांची बोगस भरती केल्याची तक्रार खुद्द माजी अध्यक्षानीच केली तरीदेखील हा नाना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे म्हणून गेवराईच्या डॉक्टर असणाऱ्या पदाधिकाऱ्याने त्याच्या कृत्यावर पांघरून घातले.

याच भारतीय शिक्षण संस्थेच्या लातूर येथील बोगस इंग्लिश स्कुल च्या अध्यक्षाला नीट पेपरफुटी प्रकरणी अटक झाली आणि संघाने लावलेल्या या संस्थेच्या अब्रूची लक्तरे पार वेशीवर टांगली गेली. या संस्थेचे पालक असणारे संघांचे पदाधिकारी देखील लक्ष्मी दर्शनामुळे नाना कळा अंगी असलेल्याना अभय देत असल्याची चर्चा आहे.

बोगस शालार्थ आयडी घोटाळा असो कि नीट पेपरफुटी प्रकरण या आणि अशा अनेक घोटाळ्यात ही संस्था सध्या चर्चेत आहे, त्यामुळे संघाच्या वरिष्ठ लोकांनी किंवा सरकार मधील मुख्यमंत्री यांनी या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची पाळे मुळे खोदून काढावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जातं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version