पंढरपूर -पंढरपूरच्या रांजनी गावात भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंढरपूरच्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ८ ते ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ग्रुप पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावतील असल्याची माहिती आहे.
म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असताना येथील विहिरीत त्यांचे पिकअप वाहन पडले. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील भाविकांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावर परिस्थिती भीषण असून पिकअपमधील सर्वच भाविक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली आहे. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे.
दरम्यान, येथील विहिरीजवळ यापूर्वी अपघात झालेले नाहीत,यापूर्वी इथं अपघात झाला नव्हता. हा पहिलाच अपघात असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं आहे. विहिरीतून क्रेनद्वारे सुरुवातीला पिकअप जीप बाहेर काढली जाईल, त्यानंतर विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढले जातील, अशी माहिती आहे.





Leave a Reply Cancel reply