सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण अष्टमी
🌸 नक्षत्र…. शततारका
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ०८ जून २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०८ जुन २०२६‼️
मेष:- आनंदी दिवस आहे. नातेवाईक मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल.
वृषभ:- कौशल्यपूर्ण कामातून प्रगती साधेल. जबाबदारी वाढेल आपल्याकडून अपेक्षा वाढू शकतात. संयमाने यश मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी.
मिथुन:- नियोजनानुसार कामात प्रगती साधाल. बौद्धिक क्षमता वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. सुसंवाद महत्वाचा असेल.
कर्क:- मनाची चंचलता असेल. आर्थिक व्यवहारात दक्षता ठेवावी लागेल. आध्यात्मिक विषयात रुची वाढेल. ध्यान प्राणायामाने प्रसन्नता वाढू शकते.
सिंह:- चांगला दिवस आहे. परिवारातून सहकार्य मिळेल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. महत्त्वाच्या चर्चा सकारात्मक होतील. यश लाभेल.
कन्या:- जबाबदारी वाढल्याने कामावर ताण येईल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
तुळ:- चांगला दिवस आहे. आनंददायक बातमी मिळेल. नियोजनानुसार यश लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल परंतु पूर्ण विश्वासून राहू नका.
वृश्चिक:- चांगला दिवस आहे. कौटुंबिक कामामध्ये प्रगती होईल. नियोजित कामातील प्रगतीमुळे समाधानकारक दिवस आहे.
धनु:- नियोजित कामात कौशल्य प्रभावी ठरेल. सुसंवादाने मन जिंकाल. प्रवासाचे योग संभवतात. नविन परिचयातून प्रगती साधेल.
मकर:- कौशल्यपूर्वक संवादाने महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतिल. परिवारीक जीवन आनंददायक असेल. नवीन खरेदीचा योग संभवतो.
कुंभ:- उत्साहपूर्वक कामामध्ये आत्मविश्वासपूर्वक पूर्तता कराल. नवीन योजना आणि कल्पना यशस्वी ठरतील. नविन कामाची संधी उपलब्ध होईल. नातेसंबंध सुधरतील.
मीन:- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग होईल. संयमाने वागा सकारात्मक विचार वाढवा चांगले कार्य संपन्न होईल.





Leave a Reply Cancel reply