अंबड – वाळू ठेकेदाराकडून तब्बल सहा लाख 40 हजार रुपयांची लाच आपल्या स्वतःच्या घरी घेताना अंबड चा तहसीलदार विजय चव्हाण या लाचखोराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीडच्या पथकाने शनिवारी सायंकाळी अटक केली.
अंबड तालुक्या अंतर्गत गोदावरी नदीच्या पात्रात गेल्या चार ते पाच महिन्यापासून अधिकृत आणि अनधिकृत वाळू ठेक्यावरून कोट्यावधी रुपयांची वाळू वाहतूक सुरू आहे या अवैध वाळू वाहतुकीला अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याची साथ होती त्यामुळेच बळेगाव पासून ते अनेक वाळूच्या ठेक्यावरून करोडो रुपयांची वाळू चोरी केली जातं होती.तहसीलदार विजय चव्हाण हा स्वतः कारवाईसाठी जायचे नाटक करायचा आणि वाळू वाल्यासोबत सेटलमेंट करून एका व्हिजिट साठी किमान पाच ते सात लाख रुपये घ्यायचा. त्याच्या अधिकार क्षेत्रात अनेक ठिकाणी लिलवाद्वारे तसेच बेकायदेशीर पणे वाळू उपसा केला जातं होता.तहसीलदार चव्हाण याची पैशाची भूक वाढतच चालली होती. त्याच्या कारभाराला सगळेच वैतागले होते. गायकवाड नावाचा एक कलेक्शन करणारा त्याने ठेवला होता. त्याच्या मार्फत हा चव्हाण हप्ते वसुल करायचा.
तहसीलदार चव्हाण याने ज्या ज्या ठिकाणी अधिकृत वाळू टेंडर मंजूर झाले आहेत तेथील टेंडर चालकांना देखील प्रचंड त्रास दिला आहे. प्रत्येक ठिकाणावरून महिन्याला पाच दहा लाख रुपये तसेच दररोज किमान त्याच्या नावावर दोन पाच गाड्या फ्री सोडव्या लागतं होत्या. त्याचा गायकवाड नावाचं कलेक्शन वाला हा साष्ट पिंपळगाव या भागातील रहिवासी असून तो वाळू वाल्याकडून हप्ते गोळा करत असे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान तहसीलदार चव्हाण याच्या पापाचा घडा भरला आणि शनिवारी सायंकाळी बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला सहा लाख चाळीस हजार रुपयाची लाच घेताना त्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी अटक केली.
त्याच्या घराची झडती घेण्यात येतं असून त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता सापडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.





Leave a Reply Cancel reply