सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण षष्ठी
🌸 नक्षत्र…. श्रवण
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. ०६ जून २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ६ जून २०२६‼️
मेष:- उत्साहपूर्वक आत्मविश्वासाने कामामध्ये प्रगती साधाल. नविन कल्पकतेने कामातील अडथळे दूर होतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. चांगला दिवस आहे.
वृषभ:- कौटुंबिक जीवन आनंदाचे असेल. जवळच्या प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. आनंददायी घटना घडतील. मन प्रसन्न राहील.
मिथुन:- कौशल्यपूर्ण कामामध्ये महत्त्वाची जबाबदारी पूर्ण कराल. गुंतवणुकीतून लाभ संभवतात. आनंदी दिवस आहे. सहकार्यांसोबत आनंद व्यक्त कराल.
कर्क:- आत्मविश्वास वाढेल. इतरांवर आपल्या कामाची छाप पडेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक कामे मार्गी लागतील.
सिंह:- अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवास घडतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन लागेल. मानसिक चंचलतेला आवर घाला. आर्थिक नियोजन योग्यरितीने पार पाडावे.
कन्या:- आनंदी दिवस आहे. आर्थिक आवक वाढेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन ओळखीतून कामांना गती मिळेल. अपेक्षित यश मिळेल. सुसंवाद अवश्यक आहे.
तुळ:- प्रगतीकारक दिवस आहे. कौशल्यपूर्ण कामामधून वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील. व्यवहारात दक्ष असावे लाभ होतील.
वृश्चिक:- चांगला दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवासातून लाभ संभवतो. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक होईल. आर्थिक लाभ होईल.
धनु:- मनाची चंचलता नकारात्मक विचार दूर करा. गुप्त शत्रूंवर विजय मिळवाल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. संयमाने केलेले कार्य लाभदायक ठरेल.
मकर:- उत्साहवर्धक दिवस आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्य संपादन कराल. नियोजनबद्ध कामात यश मिळेल. कुटुंबातून सहकार्य मिळेल. मित्र नातेवाईकांचे संबंध चांगले होतील.
कुंभ:- खर्चाविषयी सावधानता बाळगावी अचानक खर्च वाढू शकतो. आध्यात्मिक कार्यात मन लागेल. संयमाने घ्या यश मिळेल.
मीन:- चांगला दिवस आहे. कामामध्ये प्रगती साधेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. कामामध्ये सातत्य ठेवावे कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होईल.





Leave a Reply Cancel reply