News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल पोर्णिमा समाप्ती ०२/१७ मि./ अहिल्याबाई होळकर जयंती ( तारखेप्रमाणे )
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ३१ मे २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️ ‼️ दिनांक ३१ मे २०२६‼️

मेष
आज
कामात वेग आणि आत्मविश्वास दिसेल. घरातील एखादी जबाबदारी व्यवस्थित पार पडेल. संध्याकाळनंतर जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीसोबत संवाद वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ
आज
मन प्रसन्न राहील. मुलांच्या प्रगतीची आनंदवार्ता मिळू शकते. कला, सौंदर्य किंवा फॅशन क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत फायदा संभवतो.

मिथुन
आज
घरगुती वातावरणात शांतता निर्माण करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. आई किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून मदत मिळेल. स्थावर मालमत्तेबाबत विचार पुढे जाऊ शकतो.

कर्क
आज
आज संवादातून अनेक प्रश्न सुटतील. मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांसोबत भेट होऊ शकते. छोट्या प्रवासाचे योग आहेत. लेखन, शिक्षण किंवा मीडिया क्षेत्रातील लोकांना लाभ.

सिंह
आज
आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. आत्मविश्वासाने घेतलेला निर्णय पुढे फायदेशीर ठरेल. संध्याकाळनंतर आनंददायी बातमी मिळू शकते.

कन्या
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आज आकर्षण आणि प्रभाव वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस. बुधाच्या कृपेने बुद्धिमत्ता आणि वक्तृत्व चमकेल. महिलांना सन्मान मिळेल.प्रवासाचे योग.

तुळ
आज दिवस संथ राहील.मोजके बोला.
संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येणार असल्याने मन हलके आणि आनंदी वाटेल. सौंदर्य, नातेसंबंध आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल. एखादी जुनी चिंता दूर होईल.

वृश्चिक
आज
मित्रपरिवारातून मदत मिळेल. कामातील अडथळे कमी होतील. आज सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे संकेत.

धनु
आज
करिअर आणि जबाबदाऱ्यांमध्ये प्रगती दिसेल. मोठ्या व्यक्तीकडून कौतुक होऊ शकते. घर आणि काम यामध्ये संतुलन साधणे आवश्यक राहील. धार्मिक विचारांकडे ओढ वाढेल.

मकर
आज
भाग्याची साथ लाभेल. शिक्षण, परीक्षा किंवा परदेश विषयक प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळेल. गुरू योगामुळे अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल.

कुंभ
आज
भावनिक विषयांमध्ये संयम ठेवणे आवश्यक. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. गुप्त चिंता कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थना उपयोगी ठरेल. संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल.

मीन
आज
जोडीदार, कुटुंब आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. भागीदारीच्या कामांमध्ये यश मिळेल.आज नवीन संपर्क लाभदायक ठरतील. मनात सकारात्मक ऊर्जा राहील.महत्वाची कामे संध्याकाळच्या आत करून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version